भाजप-शिवसेना युतीवर उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा खुलासा!

भाजप-शिवसेना युतीवर उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा खुलासा!

' युतीची घोषणा वरळीच्या ब्लू सी हॉटेलमध्ये झाली तेव्हा सगळ्या जबाबदार व्यक्ती उपस्थित होत्या. आमचं ठरलेलं आहे, त्यामुळे या चर्चेला अर्थ नाही.'

  • Share this:

मुंबई 28 ऑगस्ट : विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. स्वबळावर लढलं तर भाजपला बहुमत मिळेलं असं काही सर्व्हेत स्पष्ट झाल्यानं भाजप स्वबळाची तयारी करत असल्याचंही बोललं जाऊ लागलंय. या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केलाय. शिवसेना आणि भाजप यांची युती ठरली असून त्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. मनोमिलन तेव्हाच झालं असून आता पुढे युती आणखी भक्कम कशी करायची तेच ठरवायचं आहे असं त्यांनी आज स्पष्ट केलं.

काँग्रेसचे नेते दिलीप माने यांनी शिवसेने प्रवेश घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, युतीच्या मनोमिलनावर प्रश्न चिन्हं उपस्थित करण्याचं काहीच कारण नाही. युतीची घोषणा वरळीच्या ब्लू सी हॉटेलमध्ये झाली तेव्हा सगळ्या जबाबदार व्यक्ती उपस्थित होत्या. आमचं ठरलेलं आहे, त्यामुळे या चर्चेला अर्थ नाही.

काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह... यामुळे रद्द झाली 'महापर्दाफाश' सभा

परिस्थिती चांगलीच आहे, चांगले सहकारी येतायत त्यामुळे युती होणार. मी याआधीही उत्तर दिलंय, उत्तर तेच आहे.पुनर्वसन करण्यासाठी कोणालाही  अंधारात ठेवलेलं नाही, आधीच सगळं सांगून आम्ही लोक घेतोय. सगळेच पदासाठी येतात असं नाही. ब्रेक के बाद, ब्रेक के बाद असे प्रवेश होतायत, दिलप आमचे जुने सहकारी आहेत , काही कारणास्तव ते गेले होते, आणि आता पुन्हा मोठ्या ताकदीने ते सेनेत येतायत,

भुजबळांवर प्रतिक्रिया

ज्या काही गोष्टी होतायत त्या तुमच्या साक्षीने होतायत, पुढेही होतील त्या तुमच्या समोरच होतील. राहुल गांधी यांना वेळाने का होईना, त्यांना कळलं हे चांगलं झालं असा टोलाही त्यांनी लगावला.

VIDEO: काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना कोर्टाकडून वॉरंट

दिलीप माने काय म्हणाले?

चांगलं वाटतंय, 23 वर्षांनी घर वापसी झाली. तिकिटांचा विषय आला म्हणून सांगतो की, कार्यकर्त्यांनी, मित्रांनी मला हा निर्णय घेण्यास सांगितले म्हणून मी हा निर्णय घेतला. शिवसेनेकडून त्याच मतदार संघातून मी निवडणूक लढवणार, राष्ट्रवादीनं दोनदा तिकीट नाकारलं तरी सोबत होतो. शिखर बँकेसंदर्भात माझं ही नाव आहे, मी चौकशीला सामोरं जाणार आहे. इथे यायचा निर्णय घेतला त्या नंतर ही नोटीस आलीय.

गुंडांचा त्रास, अखेर दाम्पत्याने घेतले पेटवून; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 03:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading