मुंबई, 2 एप्रिल : उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray on lockdown) यांनी राज्यातील जनतेला संबोधित करत आगामी दोन दिवसांत जर राज्यातल्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर कठोर पावलं उचलावी लागणार असल्याचा सल्ला दिला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांबाबत माहिती दिली. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत वक्तव्य करणाऱ्यांचा समाचारही घेतला. यात एका उद्योगपतीच्या वक्तव्यालाही उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर दिलं. हे उत्तर उद्धव ठाकरेंनी आनंद महिंद्रा यांच्या ट्विटमधील वक्तव्यावर दिल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता याबाबतचं प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संबोधनामध्ये एका उद्योगपतीच्या वक्तव्याचा उल्लेख केला. या उद्योगपतीने लॉकडाऊन करण्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करा असा सल्ला दिला होता. आरोग्य सुविधा वाढवल्याच आहेत आणि त्या वाढवणे सुरुच आहे, पण केवळ आरोग्य सुविधा वाढवून चालणार नाही, तर त्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांची गरज आहे. आरोग्य सुविधा हाताळण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासत असते. त्यांचा पुरवठा हे उद्योगपती करणार का? असा टोला देत मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये न करण्याची विनंती केली आहे.
प्रसिद्ध उद्योगपती आनंदग महिंद्रा यांनी 4-5 दिवसांपूर्वी एका ट्विटद्वारे मुख्यमंत्री आणि सरकारच्या कारभाराबाबत वक्तव्य केलं होतं. लॉकडाऊनचा त्रास हा केवळ गरिबांना आणि छोट्या व्यावसायिकांना होत असतो. लॉकडाऊन हे आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून असते. त्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे असे ट्विट केले होते. त्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
The problem, @OfficeofUT ji, is that the people a lockdown hurts most are the poor, migrant workers & small businesses. The original lockdowns were essentially to buy time to build up hospital/health infrastructure. Let’s focus on resurrecting that & on avoiding mortality. https://t.co/sRoWonrJEp
— anand mahindra (@anandmahindra) March 29, 2021
यावेळी बोलताना सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची एकूण स्थिती आणि आतापर्यंत राज्य सरकारनं कशा प्रकारे आरोग्य सुविधा उभारल्या आहेत, याची माहिती दिली. पण केवळ आरोग्य सुविधा उभारून चालणार नाही. त्यासाठी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारीही लागतात ते कुठून आणायचे असा सवाल केला. त्यामुळं सर्वांनी खबरदारी बाळगायलाच हवी. आगामी दोन दिवंसांत राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय जाहीर करणार असल्याचंही उद्धव म्हणाले. मात्र स्थिती सुधारली नाही तर लॉकडाऊन लावावेच लागेल असा इशाराही त्यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anand mahindra, Lockdown, Uddhav tahckeray