MPSC च्या परीक्षांबाबत घेतला मोठा निर्णय; कोरोनाच्या कहरात ठाकरे सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा

MPSC च्या परीक्षांबाबत घेतला मोठा निर्णय; कोरोनाच्या कहरात ठाकरे सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा

आज काँग्रेसच्या जेईई आणि नीटच्या परीक्षांबाबत घेतलेल्या वर्च्युअल बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते

  • Share this:

मुंबई, 26 ऑगस्ट : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना देशभरात जेईई आणि नीटच्या परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग्याच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (MPSC) पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. याची पुढील सुधारित वेळापत्रक लवकरच शेअर केले जाईल, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जेईई आणि नीटच्या मुद्दयावरुन आज काँग्रेसने वर्च्युअल बैठकीचं आयोजन केलं होतं. जेईई आणि नीटच्या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की परीक्षा घ्यायला हव्यात पण परिस्थिती सुधारल्यानंतर. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर 97000 मुलांना कोरोनाची लागण झाली होती. जर आपल्याबाबत अशी परिस्थिती ओढावली तर काय करणार?

दरम्यान आज काँग्रेसच्या वर्च्युअल बैठकीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत जेईई, नीट आणि जीएसटी या मुद्द्यांवरुन मुख्यमंत्र्यांनी ऊहापोह केला. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जेईई आणि नीट या परीक्षांविरोधात संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मागणी केली. सर्वच मुख्यमंत्र्यांनी सध्या कोरोनाच्या कहरात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये असं आवाहन केलं. दुसरीकडे जीएसटीच्या आणि केंद्राकडून मिळत नसलेल्या मदतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं.

Published by: Meenal Gangurde
First published: August 26, 2020, 6:53 PM IST

ताज्या बातम्या