• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • उद्धव ठाकरे आणि राज्यपालांची होणार भेट, राजकीय स्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता

उद्धव ठाकरे आणि राज्यपालांची होणार भेट, राजकीय स्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता

उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात राज्यातील स्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

  • Share this:
मुंबई, 25 एप्रिल : उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता यांचा शपथविधी आज संध्याकाळी राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत होणार आहे. या शपथविधीच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात राज्यातील स्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. याच प्रस्तावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेचे सदस्य बनवण्यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभा किंवा विधान परिषद या दोघांपैकी एका सभागृहाचं सदस्य होणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सहा महिन्याचा कालवधी पुढील महिन्यातील 28 मे रोजी संपत आहे. सध्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही केलेली नाही. राज्यपालांनी सही न केल्यास महाविकास आघाडीचा प्लॅन तयार राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांची आमदारकीसाठी नियुक्ती न केल्यास महाविकास आघाडीकडून प्लॅन बी चा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. या प्लॅननुसार उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर तिन्ही पक्षाचे गटनेते समर्थन पत्र घेऊन राज्यपालांची भेट घेतील आणि पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करतील. त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील. अशा प्रकारचा प्लॅन महाविकास आघाडीकडून आखला जाण्याची शक्यता आहे. संपादन- अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published: