... म्हणून ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होता होता राहिला

... म्हणून ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होता होता राहिला

शिवसेना आणि राष्ट्रवादीचं ठरलं पण काँग्रेसचं काय? राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार वर्षाअखेरीस की नव्या वर्षात?

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर: ठाकरे सरकार सत्तेत येऊन जवळपास एक महिना होत आला तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच कायम आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल असं शिवसेनेकडून सांगितलं जात होतं. मात्र हा विस्तार नेमका कधी होणार याबाबत अद्यापही ठोस निर्णय झाला नसल्यानं आमदारांच्या मनातही काहीसा संभ्रम आहे. तर काँग्रेसमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. या भेटीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची विस्ताराची सगळी चर्चा पूर्ण झाली असून नावंही फायनल झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र काँग्रेसचा निर्णय अजुनही झालेला नाही. काँग्रेसची यादी न आल्यामुळे हा विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.

वाचा-मंत्रिमंडळ विस्तारात पत्ता कट होणार का? पृथ्विराज चव्हाणांनी दिलं हे उत्तर

काँग्रेसमधून कोणाला मंत्रिपद द्यायची याची अंतिम यादी ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काही नेते दिल्लीत दाखल झाले आहे. दिल्लीत काँग्रेसची यादी या दोन दिवसांत फायनल झाल्यास मंत्रिमंडळ विस्तार महिन्या अखेरीस केल्या जाण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. तर काँग्रेसनं निर्णय घेतला नाही तर कदाचित हा विस्तार नव्या वर्षाच्या सुरुवातील केला जाईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. काँग्रेसकडून फारच उशीर होत असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते असेही काही नेत्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान दिल्लीत सोमवारी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. यावेळी माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यायचे काही नाही याबाबत अद्याप राज्यातील काँग्रेस नेत्यांसमोर पेच असल्यानं त्याबाबत विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

वाचा-फडणवीसांना लवकरच कंठ फुटला, शरद पवारांची सडकून टीका

ग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सगळे आमदार विस्ताराची वाट पाहात असून केव्हा निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हा विस्तार हा तिनही पक्षांचा मिळून होणार असल्याने त्याला वेळ लागतोय अशी माहिती आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबात तासभर चर्चा केली. काँग्रसकडून पृथ्विराज चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नाही अशी चर्चा आहे. त्यांना पक्षातच मोठं पद दिलं जाऊ शकते असं म्हटलं जातंय. मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कापला जाणार का? या चर्चेला पृथ्वीराज चव्हाणांनीच उत्तर दिलंय.ते म्हणाले, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल. आमच्यात पदांसाठी वाद नाहीत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षनेतृत्वाच्या पातळीवर निर्णय झालेला आहे. योग्य वेळी ते तो सांगतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी पक्षातील नेते शपथविधी  लवकर घ्यावा यासाठी आग्रही आहेत, पण सेनेकडून काँग्रेस वाट पाहवी त्यानंतर निर्णय घेऊ अस सांगण्यात येत आहे. काँग्रेस कडून दुपारीपर्यंत शपथविधी बाबत निरोप दिला जाईल अशी माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. बहुमत सिध्द करणं आणि हिवाळी अधिवेशन चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी विस्तार थांबविण्यात आला होता. विस्तारात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो अजित पवारांच्या समावेशाचा. त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार का? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं नाही तर राष्ट्रवादीत नाराजी उफाळून येवू शकते अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.

वाचा-मुख्यमंत्रिपद गेल्याची सल कायम, फडणवीस म्हणतात, मी पुन्हा येणारच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2019 07:34 AM IST

ताज्या बातम्या