सामनातील हे 5 अग्रलेख जे उद्धव ठाकरेंनाही आता विसरून जावेसे वाटत असतील!

सामनातील हे 5 अग्रलेख जे उद्धव ठाकरेंनाही आता विसरून जावेसे वाटत असतील!

2014 साली युती तुटल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाजपवर अनेकदा जहरी टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : नाही नाही म्हणता म्हणता अखेर भाजप आणि शिवसेना लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. पण 2014 साली युती तुटल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाजपवर अनेकदा जहरी टीका केली आहे.

भाजप आणि शिवसेना आता एकत्र तर आले आहेत. पण गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांवर केलेली टोकदार टीका हे नेते कसे विसरणार आहेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेनं सत्तेत असतानाही भाजपवर विरोधीपक्षाप्रमाणे टीका केली आहे.

सामनातील 5 अग्रलेख ज्यातून 'ठाकरी तोफ 'भाजपवर धडाडली

1. 'सगळीकडेच फेल... त्यात राफेल'

'व्यापार उदिमापासून शेतीपर्यंत सगळीकडेच 'फेल', महागाईचे 'तेल' आणि त्यात 'राफेल', असं म्हणत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला करण्यात आला. '2019...परिवर्तनाचं वर्ष' या शीर्षकाखाली लिहिण्यात आलेल्या अग्रलेखातून शिवसेनेनं लोकसभा निवडणुकांवरही भाष्य केलं होतं.

2. 'थापा मारून नेहमी जिंकता येत नाही'

देशातील पाच राज्यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे. तर तेलंगणा आणि मिझोराम प्रादेशिक पक्षांकडे गेले. या पराभवानंतर सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेबरोबर भाजपचा 'सामना' झाला . शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. 'थापा मारून नेहमी जिंकता येत नाही,' असं म्हणत शिवसेनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं होतं.

3. 'आधी मंदिर, मग सरकार'

राममंदिर उभारणीसाठी आम्हालाही झोपलेल्या कुंभकर्णांना जागे करायचे आहे. रामाच्या नावाने जी सत्ता मिळवली, त्याची चार वर्षे सरून गेली. पण आमचा राम मात्र अयोध्येतच वनवासात आहे निवडणुका आल्या आहेत म्हणून जागे होऊ नका 'आधी मंदिर, मग सरकार' अशी गर्जना करत शिवसेनेनं भाजपवर टीका केली होती.

4. 'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'

‘विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी वेळ येताच ते फुटतात. महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये नेहमीच व्यापार-उद्योगात प्रगतशील मानली जातात, पण औद्योगिक प्रगतीत कर्नाटकने गुजरात आणि महाराष्ट्राला मागे टाकले आहे,’ असं म्हणत शिवसेनेचे मुखपत्र सामनातून सरकारवर निशाणा साधण्यात आला होता.

5. ‘...म्हणून भाजपचं ढोंग उघडं पडलं'

भाजप महाराष्ट्रातील शनिशिंगणापूरच्या मंदिराबाबत एक आणि केरळातील शबरीमाला मंदिराबाबत दुसरी भूमिका घेत आहे. भाजपचे हे ढोंग आता पडले आहे, असं म्हणत शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवण्यात आला.‘सर्व मंदिरांत महिलांनी घुसावे असं सांगणाऱ्यांनी शबरीमाला मंदिरात महिलांना जाण्याचा अधिकार नाही व न्यायालयाने यात पडू नये असे सांगावे हे ढोंग आता उघडे पडले,’ असं म्हणत सामनातून भाजपच्या मंदिरांविषयीच्या भूमिकेवर टीका करण्यात आली होती.

VIDEO : युतीनंतर सोमय्यांविरोधातील आक्रमक शिवसैनिक थेट मातोश्रीवर, उद्धव ठाकरे म्हणतात...

First published: February 20, 2019, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading