पालघरमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध योगी आदित्यनाथ

पालघरमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध योगी आदित्यनाथ

पालघर लोकसभेसाठी भाजपकडून हिंदू कार्ड खेळलं जातंय. शिवसेनेच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने हिदुत्वचे फायर ब्रँडनेते योगी आदित्यानाथ यांना पाचारण केलं आहे.

  • Share this:

पालघर, 22 मे : पालघर लोकसभेसाठी भाजपकडून हिंदू कार्ड खेळलं जातंय. शिवसेनेच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने हिदुत्वचे फायर ब्रँडनेते योगी आदित्यानाथ यांना पाचारण केलं आहे. हे आदित्यनाथ कार्ड महाराष्ट्रमध्ये चाललं तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे आदित्यनाथ हेच मुख्य प्रचारक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पालघरमध्ये शिवसेनेचं आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यालाच टक्कर देण्यासाठी भाजपने योगी आदित्यनाथ याना प्रचारात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. त्यामुळे भाजपची ही खेळी किती काम करते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पालघरमध्ये ख्रिश्चन समाजाचं प्राबल्य आहे. त्याविरोधात हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठीही योगी आदित्यनाथांना बोलावलं गेल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे कर्नाटकाइतक्याच चुरशीच्या अशा या पालघर निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

First published: May 22, 2018, 1:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading