उदयनराजे पुन्हा खासदार होणार का? अमित शहांच्या घरी बैठक सुरू

उदयनराजे पुन्हा खासदार होणार का? अमित शहांच्या घरी बैठक सुरू

राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अमित शहांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक सुरू आहे.

  • Share this:

दिल्ली, 14 फेब्रुवारी : राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अमित शहांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला भाजप नेते चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार हे नेते उपस्थित आहेत. माजी खासदार उदयनराजे भोसले हेही या बैठकीत आहेत.यामुळेच उदयनराजे भोसले राज्यसभेच्या मार्गाने पुन्हा खासदार होणार का याची जोरदार चर्चा आहे.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये

विधानसभा निवडणुकीच्या आधी उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रतिष्ठेची झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे उदयनराजेंचं राजकीय भवितव्य काय असणार याबाबत चर्चा सुरू झाली होती.

उदयनराजेंच्या 2 अटी

भाजपमध्ये प्रवेश करताना उदयनराजेंनी दोन अटी ठेवल्याची चर्चा होती. त्यातील पहिली अट म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेणे आणि दुसरी म्हणजे लोकसभेत पराभव झाल्यास राज्यसभेवर पक्षाने नियुक्ती करणे. त्यामुळे आता पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपकडून उदयनराजेंना संधी मिळणार का हे पाहावं लागेल.

चंद्रकांत पाटील यांचा दिलासा

'उदयनराजेंचा पराभव आमच्यासाठी अनपेक्षित आहे. त्यांचा पराभव झाला असला तरी पक्षसंघटना त्यांची योग्य ती काळजी घेईल, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजेंना दिलासा दिला होता. आता उदयनराजेंना भाजपकडून मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.दरम्यान, उदयनराजे भोसले यांना एका खंडणी प्रकरणात सातारा सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. लोणंदमधल्या सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि त्यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल खटल्यात सातारा सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांना निर्दोष ठरवलं आहे. (Extortion case judgement of Udayanraje Bhosale)

====================================================================================

First published: February 14, 2020, 7:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading