मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अॅट्राॅसिटीसाठी तत्परता दाखवली मग मराठा आरक्षणासाठी का नाही ?-उदयनराजे भोसले

अॅट्राॅसिटीसाठी तत्परता दाखवली मग मराठा आरक्षणासाठी का नाही ?-उदयनराजे भोसले

पुणे, 03 आॅगस्ट : सुप्रीम कोर्टाने अॅट्राॅसिटी अटी शिथिल केल्या,पण केंद्राने तत्परता दाखवली मग हीच तत्परता मराठा आरक्षणासाठी का दाखवली नाही असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थितीत केला. तसंच  कोणाची हरकत नाही मग 25 वर्षे आरक्षण प्रश्न का सोडवला गेला नाही. इच्छाशक्ती नाही आणि आजपर्यंत घडलेले राजकारण ही 2 कारणे जबाबदार आहे अशी टीकाही उदयनराजेंनी केली.

उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

- जसं इतर समाजाला आरक्षण देण्यात आलं तसं मराठा  मुस्लिम धनगर समाजालाही समान न्याय मिळाला पाहिजे

- जोपर्यंत कायदा करत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही

- परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही याची समज सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनीही घ्यावी

- आरक्षण मिळत नाही मिळतं दरोड्याच्या केसेस ,खुनाच्या केसेस,या केसेस मागे घ्या अन्यथा अजून भडकेल

- सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी माणुसकी दाखवावी. आपण लोकांना उत्तरदायी आहोत ही जाणीव लोकप्रतिनिधींनी ठेवावी. कोणता पर्याय नाही उरलाम्हणून आंदोलन

- मार्ग निघाला नाही म्हणून ही परिस्थिती

- ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलंय त्यांना उत्तर द्यायला आपण बांधिल आहोत याची जाणीव असावी

- सरकारने मोर्च्यांची दखल घेतली पण धुळफेक केली,दुर्लक्ष केलं..तेव्हाच सोडवायला पाहिजे होता. आज वेळच तशी आली नसती

- आंदोलन हिंसक नको.सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान नको..आंदोलनाची दिशा ठरवावी. 2 वर्षांपूर्वी 58 मोर्चे निघाले

- आरक्षण आधीच मार्गी लागलं असतं तर ही वेळ आलीच नसती

- मराठा मुस्लिम धनगर जाट गुज्जर पाटीदार या सर्वांना आरक्षण देण्यात ही तत्परता दाखवावी जी अॅट्राॅसिटीबाबत दाखवली

- सुप्रीम कोर्टाने अॅट्राॅसिटी अटी शिथिल केल्या,पण केंद्राने तत्परता दाखवली मग हीच तत्परता मराठा आरक्षणासाठी का दाखवली नाही

- कोणाची हरकत नाही मग 25 वर्षे आरक्षण प्रश्न का सोडवला गेला नाही. इच्छाशक्ती नाही आणि आजपर्यंत घडलेले राजकारण..ही 2 कारणे जबाबदार आहे.

- मागासवर्गीय आयोग भेट घेतली. 2,3 महिने लागतील असं आयोगाने सांगितलं. राज्य सरकार ने गती द्यायला पाहिजे. राज्य सरकारने आयोगाला मनुष्यबळ पुरवावे. हे फार पूर्वी व्हायला पाहिजे होते. मराठा ,मुस्लिम ,धनगर हे आरक्षणापासून वंचित

- जर कुणाचीच हरकत नसेल तर 25 ते 30 वर्षांपासून हा विषय का सोडवला गेला नाही

- मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेला गती देण्याची गरज ही राज्यशासनाची जबाबदारी

First published:

Tags: Aurangabad, Maratha reservation, Parbhani, Parbhani news, Protest, Pune, Udayan raje bhosle, उदयनराजे भोसले, पुणे