मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सीमोल्लंघन करणार का?

उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सीमोल्लंघन करणार का?

नाराज असलेले उदयनराजे हे भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येतेय दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजे सीमोल्लंघन करणार का? याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.

नाराज असलेले उदयनराजे हे भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येतेय दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजे सीमोल्लंघन करणार का? याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.

नाराज असलेले उदयनराजे हे भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येतेय दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजे सीमोल्लंघन करणार का? याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.

  मुंबई, 10 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. राजे हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असून साताऱ्यात त्यांना पक्षातूनही विरोध होतोय. त्यामुळं ंही भेट महत्वाची मानली जातेय. उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणाऱ्या प्रत्येकाचं भाजपमध्ये स्वागत आहे.  उदयनराजे तर छत्रपतींचे वंशज आहेत असे सूचक उदगार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीनंतर काढले आहेत. नाराज असलेले उदयनराजे हे भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत असून दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजे सीमोल्लंघन करणार का याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय. उदयनराजे हे साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी शरद पवार यांचा अपवाद सोडला तर ते अन्य कुठल्याही नेत्याला फारसे जुमानत नाहीत. सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचं आणि त्यांचंही फारसं पटत नाही. राष्ट्रवादीच्या पक्षबांधणीतही ते फारसे सक्रिय नसतात असाही त्यांच्यावर आरोप होतो. त्यामुळं यावेळी त्यांना तिकीट मिळणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात बैठक घेऊन मतदार  संघाचा आढावा घेतला होता. त्या बैठकीलाही राजे उपस्थित राहिले नाहीत. या बैठकीत पक्षाच्या अन्य नेत्यांनी उदयनराजे यांच्याविरोधात तक्रारी केल्या. पक्षाला त्यांचा काहीच उपयोग होत नसेल तर मग तिकीट तरी कशाला देता असा सवाल स्थानिक नेत्यांनी पवारांना केला. उदयनराजे हे कुठल्याही पक्षात असले तरी त्यांची कामाची स्वतंत्र स्टाईल आहे. आणि त्यांना मानणाऱ्यांचा एक मोठा वर्ग सातारा जिल्ह्यात आहे. त्यामुळं त्याचं एक स्वतंत्र संस्थानच आहे असं मानलं जातं. शरद पवार घेतील तो निर्णय मान्य असेल असं उदयनराजेंनी म्हटलं होत. त्याचबरोबर सगळ्याचं पक्षात आपले मित्र आहेत असही ते म्हणाले होते. या आधीही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळं लोकसभा निवडणुकीला आता काही महिने राहिले असताना उदयराजे कुठली भूमिका घेतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.

  VIDEO उत्तराखंड ते नागपूर, कोण आहे हा एजंट निशांत?

   
  First published:

  Tags: BJP, Cm devendra Fadanvis, NCP, Satara, Sharad pawar, Udayanraje bhosle, उदयनराजे भोसले, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, सातारा

  पुढील बातम्या