SPECIAL REPORT : राष्ट्रवादीत जिंकले पण आता हरण्याची उदयनराजेंनाच भीती, 'ही' टाकली भाजपला अट?

SPECIAL REPORT : राष्ट्रवादीत जिंकले पण आता हरण्याची उदयनराजेंनाच भीती, 'ही' टाकली भाजपला अट?

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. शनिवारी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत ते भाजपात दाखल होणार आहेत.

  • Share this:

सागर कुलकर्णी,प्रतिनिधी

मुंबई, 13 सप्टेंबर : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. शनिवारी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत ते भाजपात दाखल होणार आहेत. काही अटींवर त्यांनी भाजपात प्रवेश केल्याची चर्चा आहे.

आपल्या बेधक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या खासदार उदयनराजे भोसलेंनी अखेर भाजपची वाट धरली आहे. भाजपच्या मेगा भरतीमुळं राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक जबर धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-सेनेत प्रवेश करण्यासाठी जणू राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जणून चढाओढ लागली आहे. नाही-नाही म्हणत असताना अखेर उदयनराजेंनी राष्ट्रवादीची साथ सोडून कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी काही त्यांनी अटी घातल्याचं बोललं जातं आहे.

खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. तसंच पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी या अटी भाजपनं मान्य केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

खरंतर उदयनराजेंनी गुरुवारी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजे राष्ट्रवादीतचं राहणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी केला होता. मात्र या भेटीनंतर अवघ्या काही तासातचं उदयनराजेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी राजेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही. उदयनराजे भलेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी अनेक वेळा त्यांनी पक्ष विरोधी भूमिका घेवून पक्षाची कोंडी केली होती. शरद पवार वगळता इतर नेत्यांना त्यांनी फारसं महत्व दिलं नाही.

अजित पवारांशी त्यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रूत आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या इतर आमदारांशीही त्यांनी कधी जुळवून घेतलं नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवारांची शिष्टाई कामी आली. विशेष म्हणजे यावेळी खुद्द शरद पवारांनी उदयनराजेंप्रमाणे कॉलर उडवली होती.

भाजपात प्रवेश केल्यानंतर उदयनराजेंसाठी आगामी पोटनिवडणूक सोपी असणार नाही. कारण जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांशी त्यांचं सख्य नाही. त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे, रामराजे निंबळकर आणि शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा अनेक वेळा राजकीय संघर्ष झाला. उदयनराजेंना मानणारा मोठा वर्ग असला तरी पोट निवडणुकीतील संभाव्य निकालाविषयी उदयनराजेंच्या समर्थकांनाही खात्री नाही. ही सगळी परिस्थिती पाहता. आगामी काळात साताऱ्यातील राजकारण मोठं रंजक होणार आहे.

====================

Published by: sachin Salve
First published: September 13, 2019, 8:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading