सस्पेन्स संपला! PM नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले आज करणार भाजप प्रवेश

सस्पेन्स संपला! PM नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले आज करणार भाजप प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले अखेर आज घड्याळ काढून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले अखेर आज घड्याळ काढून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरून उदयनराजे यांनी स्वतः भाजपप्रवेशाची माहिती दिली आहे. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपप्रवेश सोहळा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उदयनराजेंनी शुक्रवारी (13 सप्टेंबर) मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.

उदयनराजे भोसले यांचं ट्विट

'आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली, अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील', असं सांगत उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती दिली.

(वाचा : उदयनराजेंची दिल्लीकडे कूच, मुख्यमंत्र्यांसोबतचे EXCLUSIVE PHOTOS)

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी उदयनराजे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विशेष विमानानं दिल्लीत दाखल झाले आहेत. येथे पोहोचल्यानंत उदयनराजे आणि मुख्यमंत्री रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास अमित शहांच्या निवासस्थानी दाखल झाले.

(वाचा : सेनेचे उमेदवारही सीएमच ठरवणार, उद्धव ठाकरेंच्या विधानाचा अर्थ काय?)

दरम्यान,  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं. खासदारकीचा  राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे यांचा आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्य उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. तसंच रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत ते सहभागी होणार आहेत. दरम्यान, भाजपकडून मागण्या मान्य होत नसल्याने उदयनराजेंनी यू-टर्न घ्यावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. खासदारीच्या राजीनाम्यानंतर विधानसभेची आणि लोकसभेची पोटनिवडणूक एकत्र लावण्यासाठी उदयनराजे आग्रही होते. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला विलंब झाला होता.

(वाचा : महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक पुढे ढकला, हायकोर्टात याचिका!)

राज ठाकरेंचं तळ्यात-मळ्यात, मनसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 08:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading