उदयनराजेंची सुटका, तात्पुरता जामीन मंजूर

उदयनराजेंची सुटका, तात्पुरता जामीन मंजूर

न्यायालयीन कोठडीत असलेले उदयनराजे यांची आता सुटका होणार आहे.

  • Share this:

25 जुलै :  साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना अखेर दिलासा मिळालाय. उदयन राजे यांना तात्पुरता जामीन मंजूर झालाय. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेले उदयनराजे यांची आता सुटका होणार आहे.

लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि खंडणी मागितल्या प्रकरणी खासदार उदयनराजे आणि त्यांच्या 9 साथीदारांवर 22 मार्च रोजी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात 9 जणांना पोलिसांनी 23 मार्चला अटक केली होती मात्र तेंव्हापासून उदयनराजे अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर उदयनराजे काही दिवसांपूर्वी अचानक साताऱ्यात प्रकटले आणि त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सातारा शहरात रोड शो केला आणि पुन्हा गायब झाले. अखेर आज सकाळी ते स्वतःहून सातारा पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं होतं. न्यायालयीन त्यांना कोठडी सुनावली होती.

दरम्यान, प्रकृती अस्वस्थ झाल्याने उदयन राजेंना साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

साताऱ्यात बंद

उदयन राजे यांच्यावरील अटकेच्या कारवाईविरोधात त्यांच्या समर्थकांनी सातारा शहरात कडकडीत बंद पुकारला होता. या बंदचे काही  ठिकाणी हिंसक पडसादही उमटलेत. शहरात एसटी बसही फोडण्यात आलीय. खासदारांच्या समर्थकांनी पुकारलेल्या बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सातारा शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आली.

First published: July 25, 2017, 4:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading