VIDEO : 'पाटील साहेब जिंकले, पण...', निकालाबद्दल बोलताना उदयनराजे भोसलेंचा आक्रमक बाणा हरवला!

राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी जवळपास 87 हजार मतांनी उदयनराजे भोसले यांच्यावर विजय मिळवला.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 11:45 AM IST

VIDEO : 'पाटील साहेब जिंकले, पण...', निकालाबद्दल बोलताना उदयनराजे भोसलेंचा आक्रमक बाणा हरवला!

सातारा, 26 ऑक्टोबर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी जवळपास 87 हजार मतांनी उदयनराजे भोसले यांच्यावर विजय मिळवला. त्यानंतर या निकालावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'रडीचा डाव मी खेळत नाही. आदरणीय पाटील साहेब जिंकले हे खर आहे पण लोकसेवा काय केली हे लोकांनी पाहिले पाहिजे. यापुढे ही मी कार्यरत राहणार असून खचणार नाही,' असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. मात्र उदयनराजे ज्या आक्रमकपणासाठी ओळखले जातात तो बाणा यावेळी बोलताना त्यांच्यात दिसला नसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे हा पराभव उदयनराजेंच्या जिव्हारी लागला आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव करत राष्ट्रवादी श्रीनिवास पाटील जाएंट किलर ठरले आहेत. उदयनराजे भोसले यांची लोकप्रियता पाहता त्यांचा पराभव कठीण मानला जात होता. मात्र उदयनराजेंचा पक्षांतराचा निर्णय लोकांना पसंत पडला नसल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलं आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'सातारा गादीबद्दल जनतेला आदर आहे. पण उदयनराजे भोसले यांनी गादीची प्रतिष्ठा राखली नाही. मी उद्या इतर दौरे रद्द करून साताऱ्याला जाऊन राष्ट्रवादीचे उमेदवार आणि जनतेचं आभार मानणार आहे,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Loading...

SPECIAL REPORT: सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या 'या' नेत्यांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 11:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...