• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं असेल तर...', काय म्हणाले उदयनराजे?
  • VIDEO : 'राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं असेल तर...', काय म्हणाले उदयनराजे?

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 03:02 PM IST | Updated On: May 31, 2019 03:02 PM IST

    अहमदनगर, 31 मे : देशभरात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी चर्चा आहे. याबाबत आता राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'असं विलिनीकरण करायचं असेल तर आधी पक्षानं बैठक घ्यावी. सर्वांचं मत जाणून घ्यावं,' असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गुरुवारी झालेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशी चर्चा रंगत होती. याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading