'...म्हणून मी पक्ष बदलला', पत्रकाराच्या प्रश्नावर उदयनराजे भडकले

'...म्हणून मी पक्ष बदलला', पत्रकाराच्या प्रश्नावर उदयनराजे भडकले

जपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उदयनराजेंसमोर राष्ट्रवादीचं मोठं आव्हान आहे.

  • Share this:

मुंबई, 6 ऑक्टोबर : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सातारा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उदयनराजेंसमोर राष्ट्रवादीचं मोठं आव्हान आहे. त्यासोबतच त्यांची पक्षांतर करण्याची भूमिकाही लोकांना पटवून द्यावी लागणार आहे.

'काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही नरेंद्र पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली. आता मात्र तुम्ही दोघे एकत्र दिसत आहात,' असं म्हणत एका पत्रकाराने उदयनराजेंना पक्षांतराविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना उदयनराजे काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. 'मी कोणत्या पदासाठी पक्ष सोडला नाही तर साताऱ्याच्या विकासासाठी आणि लोकांसाठी पक्ष सोडला आहे,' असं उदयनराजे म्हणाले.

उदयनराजेंसमोर नवं आव्हान

भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजेंसमोर राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांच्या रूपाने आव्हान निर्माण केलं आहे. त्यानंतर आता आणखी एका उमेदवाराने निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने उदयनराजेंची डोकेदुखी वाढली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ हा युतीत पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेकडे होता. मात्र उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता ही जागा भाजपकडे गेली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांनी साताऱ्यातून आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उभा असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी उदयनराजेंसमोर आव्हान निर्माण केलं होतं.

एकीकडे राष्ट्रवादीने सर्व शक्ती पणाला लावली असताना पुरूषोत्तम जाधव यांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली असल्याने उदयनराजेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर लढून उदयनराजेंना भिडणाऱ्या नरेंद्र पाटील यांनी पोटनिवडणुकीत माघार घेतली. मात्र जाधवांच्या उमेदवारीमुळे उदयनराजेंसमोर मतविभाजन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

VIDEO : राज्याचा मुख्यमंत्री हा मराठा असावा, मराठा क्रांती मोर्च्याची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 10:49 AM IST

ताज्या बातम्या