प्रवेशानंतर उदयनराजेंकडून भाजपला पहिलं सरप्राईज, अध्यक्षांच्या बैठकीला गैरहजर

प्रवेशानंतर उदयनराजेंकडून भाजपला पहिलं सरप्राईज, अध्यक्षांच्या बैठकीला गैरहजर

उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाईल आणि बेधडकपणासाठी ओळखले जातात.

  • Share this:

पुणे, 23 सप्टेंबर : भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा पार पडत आहे. भाजप अध्यक्षांच्या उपस्थितीत होत असलेल्या या मेळाव्याला हर्षवर्धन पाटील, रणजित मोहिते पाटील आणि धनंजय महाडीक हे नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले नेते हजर राहिले. मात्र राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले हे मात्र पक्षाच्या या महत्त्वपूर्ण मेळाव्याला अनुपस्थित राहिले आहेत.

उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाईल आणि बेधडकपणासाठी ओळखले जातात. राष्ट्रवादीत असताना त्यांनी अनेकवेळा पक्षनेतृत्वावरच जाहीररीत्या तोफ डागली होती. तसंच अनेकवेळा त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला. अशातच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष घेत असलेल्या मेळाव्यालाच ते गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे उदयनराजेंनी भाजपला हे पहिलं सरप्राईज दिलं आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

उदयनराजेंना मिळणार दिलासा?

साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यासह इतर भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

हेही वाचा-'तिकीट द्या नाहीतर पक्ष सोडतो', राष्ट्रवादीच्या नेत्याचे थेट शरद पवारांना आव्हान!

'सर्वांचा विरोध असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट दिलं. जनतेनंही उदयनराजेंच्या बाजूने कौल दिला. मग त्यांनी आता अवघ्या तीन महिन्यात पक्ष का सोडला,' असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जात आहे.

हेही वाचा- मंत्रालय म्हणजे आत्महत्या करण्याची जागा झालीय, अजित पवारांचा घणाघात

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवार यांनी काल पहिल्यांदाच साताऱ्यात दाखल होत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात शरद पवारांचं स्वागत केलं. शरद पवारांच्या स्वागताला साताऱ्यात झालेल्या गर्दीनंतर उदयनराजेंसमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहिलं आहे, अशी चर्चा आहे.

हेही वाचा-मुख्यमंत्री म्हणाले, युतीचं लवकरच कळेल.. नारायण राणेंचा 'निर्णय' योग्य वेळी!

निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली, पण त्यावेळी उदयनराजेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मात्र घोषणा केली नाही. उदयनराजेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात होतं. कारण विधानसभेसोबत साताऱ्यातील पोटनिवडणूक घेण्यात यावी, अशी अट भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याचं सांगितलं जातं. मात्र आता उदयनराजेंसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. सातारा लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबतच होणार आहे. तसंच याबाबत लवकरच घोषणाही होण्याची शक्यता आहे. उदयनराजेंसाठी हा दिलासा मानला जात आहे.

VIDEO: कामाला लागा, डेंग्यूच कारण चालणार नाही! अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

Published by: Akshay Shitole
First published: September 23, 2019, 6:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading