उदयनराजेंचा शिवसेना आणि राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला, पत्रकार परिषदेतील 10 ठळक मुद्दे

उदयनराजेंचा शिवसेना आणि राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला, पत्रकार परिषदेतील 10 ठळक मुद्दे

भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

  • Share this:

सातारा, 14 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करणाऱ्या पुस्तकामुळे वादंग निर्माण झालं. भाजपवर चौफेर टीका करण्यात आली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवरायांचे वंशज कुठे आहेत? असा सवाल करत त्यांनी भाजपमधून राजीनामा द्यायला पाहिजे, अशीही मागणी केली होती. त्या टीकेचा भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

'शिवाजी महाराजांची किती मानहानी करणार?शिवस्मारक मागेच व्हायला पाहिजे होतं. स्वार्थाने एकत्र आलेले लोक फार काळ एकत्र राहत नाहीत. स्वार्थ साधला की निघून जातात. महाराष्ट्राच्या जनतेने विचार करावा. जेव्हा लोक विचारांनी एकत्र येतात तेव्हा समान उद्दिष्ट असतं. शिवाजी महाराजांच्या नावाने दंगली झाल्या. श्रीकृष्ण आयोग बघा, लोकांचे जीव गेले. शिवसेनेनं नावातून शिव काढून टाकावं, मग कळेल किती तरूण तुमच्या पाठीमागे उभे राहतात,' असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर विखारी टीका केली.

उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेतील 10 ठळक मुद्दे:

- जेम्स लेनच्या वेळी शिवसेना कुठं गेली होती अस्मिता? शिवसेनेला रोखठोक सवाल

- हे पक्ष केवळ राजकारण करत आहेत. शेतकरी मरायला लागले आहेत, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पळवापळवी सुरू होती. राज्याचा खेळ खंडोबा केला.

- शिवसेना भवनावरील चित्र बघा...शिवाजी महाराज कुठं आहेत? वरती कोण...खाली कोण... बघा

- कुणालाही 'जाणता राजा'ची उपमा देणं याचा निषेध

- जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज

- शिवाजी महाराज म्हणजे युगपुरुष

- लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का?

- पुस्तकातल्या मजकुराबद्दल वाईट वाटलं

- महाशिवआघाडीतून शिव का काढून टाकलं? शिवसेना जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का? उदयनराजेंची शिवसेनेवर टीका

- माझा राजीनामा मागण्याऐवजी जे सरकारमध्ये आहेत त्यांचा घ्या... राज्य, देश सुखी होईल

Published by: Akshay Shitole
First published: January 14, 2020, 1:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading