उदयनराजे आणि हर्षवर्धन पाटलांसह 'या' 8 दिग्गजांच्या भाजप प्रवेशाची चर्चा

उदयनराजे आणि हर्षवर्धन पाटलांसह 'या' 8 दिग्गजांच्या भाजप प्रवेशाची चर्चा

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते पक्षात घेण्याच्या जोरदार हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट :  काँग्रेस राष्ट्रवादीतील आणखी काही दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेकांच्या नावांची चर्चा आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते पक्षात घेण्याच्या जोरदार हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आणि राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये पक्षप्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीची हरकत असल्यानेच हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. याबाबत पुढील काही दिवसांत मोठ्या हालचाली होतील, अशी माहिती आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये दाखल  होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांच्यात नुकतीच दूरध्वनीवरून पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

उदयनराजेंच्या मनात काय?

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला परत एकदा मोठा धक्का बसू शकतो. उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन  भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. उदनराजेंनी भाजपप्रवेश केल्यास राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्यासह महाराष्ट्रातील इतर भागातही उदयनराजेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी कोणते नेते युतीच्या वाटेवर?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असणारे पद्मसिंह पाटील घराणे देखील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पद्मसिंह पाटलांसह त्यांचा मुलगा आमदार राणाजगजितसिंह भाजपात जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटणचे नेते रामराजे निंबाळकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. रामराजे आणि भाजप नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याचीही माहिती आहे. करमाळ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे, तसच बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे ही भाजप आणि शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 10:15 AM IST

ताज्या बातम्या