शिवरायांच्या विचाराप्रमाणे BJPचं काम चालतं, उदयनराजे भोसलेंनी हाती घेतलं 'कमळ'

शिवरायांच्या विचाराप्रमाणे BJPचं काम चालतं, उदयनराजे भोसलेंनी हाती घेतलं 'कमळ'

भाजपच्या मेगाभरतीमुळं राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उदयनराजे भोसले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : भाजपच्या मेगाभरतीमुळं राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उदयनराजे भोसले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित उदयनराजे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजपश्रेष्ठींनी सर्व अटी अटी मान्य केल्यानंतर आज (14 सप्टेंबर)भाजपप्रवेश केला.खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. तसंच पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी, या अटी भाजपनं मान्य केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

भाजपप्रवेशापूर्वी उदयनराजेंनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. यानंतर आता उदयनराजेंना पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे.

(वाचा : खरा जाणता राजा 'नरेंद्र मोदी', पवारांनी कुटुंबाच्या पलीकडे काम केले नाही!)

लोकसेवा करण्यासाठी भाजपप्रवेश- उदयनराजे भोसले

'देशाची अखंडता टिकवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचं काम करत आहेत. शिवरायांच्या विचाराप्रमाणे भाजपचं काम सुरू आहे. लोकसेवा करण्यासाठी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला', असे सांगत उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत भाजपप्रवेश केला.

दरम्यान, उदयनराजेंनी गुरुवारी (12 सप्टेंबर)शरद पवारांची पुण्यात भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजे राष्ट्रवादीतचं राहणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी केला होता. मात्र या भेटीनंतर अवघ्या काही तासातचं उदयनराजेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी राजेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही. उदयनराजे भलेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी अनेक वेळा त्यांनी पक्ष विरोधी भूमिका घेऊन पक्षाची कोंडी केली होती. शरद पवार वगळता इतर नेत्यांना त्यांनी फारसं महत्त्व दिलं नाही.

(वाचा : सेनेचे उमेदवारही सीएमच ठरवणार, उद्धव ठाकरेंच्या विधानाचा अर्थ काय?)

(पाहा : उदयनराजेंची दिल्लीकडे कूच, मुख्यमंत्र्यांसोबतचे EXCLUSIVE PHOTOS)

दुसरीकडे, भाजपात प्रवेश केल्यानंतर उदयनराजेंसाठी आगामी पोटनिवडणूक सोपी असणार नाही. कारण जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांशी त्यांचं सख्य नाही. त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे, रामराजे निंबळकर आणि शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा अनेक वेळा राजकीय संघर्ष झाला. उदयनराजेंना मानणारा मोठा वर्ग असला तरी पोट निवडणुकीतील संभाव्य निकालाविषयी उदयनराजेंच्या समर्थकांनाही खात्री नाही. ही सगळी परिस्थिती पाहता. आगामी काळात साताऱ्यातील राजकारण मोठं रंजक होणार आहे.

भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: September 14, 2019, 9:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading