मी जे हे काही करतोय त्यात माझा स्वार्थ काय आहे ? ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठं जायचं... परिणामांना मी घाबरत नाही, जे व्हायचंय ते होऊ द्या. हे सर्व करत असताना माझा स्वार्थ काय आहे ते सांगा. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. मी शेतकऱ्यांच्या हिताचं बोलतोय असंही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. 'ED ने महाराष्ट्रात यावं, पण एका अटीवर...' उदयनराजेंनी घातली अट महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ईडी (ED), सीबीआय (CBI)कडून विविध संस्था, व्यक्तींच्या विरोधात कारवाई केल्या जात आहेत. कारवाई होत असलेल्या नेत्यांमध्ये राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. सत्ताधारी केंद्रातील भाजवर आरोप करत आहेत तर भाजपचे नेते मविआ सरकारमधील नेत्यांना प्रत्युत्तर देत आहेत. याच दरम्यान भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी ईडी समोर एक अट ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी म्हटलं, नेहमी मी सांगतो, ईडीने यावं... पण एका अटीवर... कारवाई करणार असाल तर नाही तर येऊ नका. नाहीतर परत त्यांनी सांगितलं, त्यांचा फोन आला म्हणून सांगितलं. तसे असेल तर येऊ नका. येणार असाल तर सर्व प्रसारमाध्यमांसोर या आणि सांगा. ईडी जेव्हा एखादी केस घेते त्याची कारवाई करताना सर्व मीडियासमोर झालं पाहिजे.खासदार उदयनराजे भोसले यांची जिल्हा बँकेच्या ED नोटीसवरून संतप्त प्रतिक्रिया pic.twitter.com/3hEKAW7zvH
— News18Lokmat (@News18lokmat) October 30, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Satara, Udayanraje bhosale