उदयनराजे इज बॅक, भाजप सोपवणार मोठी जबाबदारी!

उदयनराजे इज बॅक, भाजप सोपवणार मोठी जबाबदारी!

भाजपच्या गोटातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे

  • Share this:

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

सातारा, 20 नोव्हेंबर : एकीकडे राज्यात सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भाजपकडून उदयनराजेंना थेट मंत्रिपदाची ऑफर दिली असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीला रामराम ठोकून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी दिल्लीत प्रवेश सोहळा पार पडला होता. परंतु, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला होता. उदयनराजेंच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला.

उदयनराजे भोसले यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, पक्षसंघटना त्यांची योग्य ती काळजी घेईल, अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. आता उदयनराजेंना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले जाणार आहे, यावर निर्णय झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तसंच राज्यातील सत्ता संघर्षामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. एनडीएतून बाहेर पडत असताना अरविंद सावंत यांनी अवजड खात्याचा राजीनामा दिला होता. आता अरविंद सावंत यांच्या जागी उदयनराजे भोसले यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

भाजपने आपली ऑफर उदयनराजे यांना कळवली आहे, याबद्दल ते काय निर्णय घेतात याची भाजप वाट पाहात आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीतून बाहेर पडत असताना उदयनराजे भोसले यांनी काही अटींवर भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा पोटनिवडणुकीत जर पराभव झाला तर राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं जाईल, हे निश्चित होतं. परंतु, आता उदयनराजेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळही पडणार असल्याचं दिसत आहे.

=======================

Published by: sachin Salve
First published: November 20, 2019, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading