सातारा, 08 जानेवारी : औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून शिवसेना (Shivsena), काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) वाद पेटला आहे. आता या वादावर भाजपचे खासदार आणि छत्रपती घराण्याचे 13 वंशज उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'नामांतर करताना कोणाची मानहानी होऊन उद्रेक होणार नाही याची काळजी घ्या' असा सल्ला उदयनराजेंनी दिला.
साताऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजे यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतरावर आपली रोखठोक भूमिका मांडली.
'एखाद्या शहराचे नामांतर करायचे असेल तर प्रत्येकाने आपली सविस्तर भूमिका मांडली पाहिजे. पण नामांतर करताना कोणाची मानहानी होऊन उद्रेक होणार नाही याचा प्रत्येकाने सविस्तर विचार करावा. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचे पूर्वज आहे. त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांचा इतिहास वाचावा. शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे केवळ महाराज होते म्हणून बघितलं नाही तर त्याच्या कर्तबगारीमुळे आणि लोक हिताच्या निर्णयामुळे ओळखत होते' असं उदयनराजे म्हणाले.
संतापजनक! चॉकलेटचं आमिष दाखवून सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
अनेक ठिकाणी आपण पाहतो की जुन्या शहरांची नाव बदलण्यात आली आहे. ज्याप्रमाणे बाँबे शहराचे मुंबई झालं त्याप्रमाणे पूर्वीपासून असलेले औरंगाबाद शहराचे नाव बदलायचे असेल तर लोकशाही नुसार लोक निर्णय घेतील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
GATE परीक्षेचं Admit Card आलं; कसं आणि कुठून कराल डाउनलोड?
दरम्यान, दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून वाद सुरूच आहे. यावर आता जास्त चर्चा करण्याची गरज नाही, आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. महाराजांच्या नावाला आमचा विरोध नाही, ते आमचे देखील श्रद्धास्थान आहे, मात्र यातून काही वातावरण निर्मिती होऊ नये, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.