Home /News /maharashtra /

VIDEO - 'महाराजांचं नाव वापरून वडापाव विकता, तर महाआघाडीतून 'शिव' का काढून टाकलं?'

VIDEO - 'महाराजांचं नाव वापरून वडापाव विकता, तर महाआघाडीतून 'शिव' का काढून टाकलं?'

वंशज म्हणून आमच्यावर टीका करता, पण राजकारण करण्यासाठी शिवसेना जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आला होतात का? अशा कडक शब्दांत माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी शिवसेनेवर टीका केली. पाहा व्हिडीओ

    पुणे, 14 जानेवारी : महाशिवआघाडीतून 'शिव'का काढून टाकलं? महाराजांच्या नावाचा वापर करून वडापाव विकता... शिववडा चालतो पण महाविकासआघाडीत शिव चालत नाही. वंशज म्हणून आमच्यावर टीका करता, पण राजकारण करण्यासाठी शिवसेना (Shiv sena) जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आला होतात का? अशा कडक शब्दांत माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी (udayan raje) शिवसेनेवर टीका केली. महाराजांचे (chatrapati shivaji maharaj) वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग कला नाही. आम्ही त्या घराण्यात जन्माला आलो याचा सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुणी होऊ शकत नाही, असं छत्रपतींचे वंशज आणि साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे यांनी टीका केली. शिवसेनेबरोबरच शरद पवार यांचंही नाव न घेता त्यांनी टीका केली. नेमकं काय म्हणाले उदयनराजे पाहा... जप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 'अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,' असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी पवारांवर निशाणा साधला. संबंधित - उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका करताच आव्हाड सरसावले, केला जोरदार पलटवार शिवाजी महाराज हे केवळ आमच्या कुटुंबाचे नाहीत. त्यांचा सन्मान ही केवळ माझी जबाबदारी नाही.महाराज सर्वांचे आहेत, असं उदयनराजे म्हणाले."छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कधी राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. जगात महाराजांची बरोबरी करण्याची उंची कुणी गाठू शकेल, असं मला वाटत नाही. युगपुरुष कधीतरीच जन्माला येतो", असंही ते म्हणाले. शिवाजी महाराज सोडा आजोबांचा -प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार तरी अंमलात आणा, असा टोलाही त्यांनी हाणला. ---------------------- अन्य बातम्या PM मोदींवरच्या त्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी आणा, मराठा समाजाची मागणी शौर्य पदक मिळवणारा DSP निघाला 'गद्दार', दहशतवाद्यांशी मिळवला हात उदयनराजेंचा शिवसेना आणि राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला, 10 ठळक मुद्दे
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published:

    पुढील बातम्या