शरद पवारांचं नाव घेताना उदयनराजे गहिवरले

शरद पवारांचं नाव घेताना उदयनराजे गहिवरले

  • Share this:

24 फेब्रुवारी : मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शरद पवार साहेब आले...असं म्हणताना उदयनराजे भोसले यांचा गळा दाटून आल्याचा प्रसंग आज साताऱ्यात पाहण्यास मिळाला.

राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे भोसले यांचा वाढदिवसाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी राजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासह अनेक दिग्गज नेते हजर होते. पण सर्वात खास उपस्थितीत होती ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची...आपल्या भाषणात शरद पवारांनी उदयन राजे यांचं तोंडभरून कौतुक केलं.

उदयन राजे भाषणाला उभे राहिले. त्यांनी भाषणाच्या सुरुवातील उपस्थिती मान्यवरांचे आभार मानले. जेव्हा शरद पवार यांचं नाव घेण्याची वेळ आली तेव्हा उदयनराजेंचा गळा दाटून आला. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शरद पवार साहेब आले हा दिवस माझ्यासाठी मोठा दिवस आहे अशी भावना उदयनराजेंनी व्यक्त केली.

First published: February 24, 2018, 8:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading