मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'मी असा तसा नाही भरपूर खाज असलेला खासदार आहे', उदयनराजेंची तुफान फटकेबाजी, VIDEO

'मी असा तसा नाही भरपूर खाज असलेला खासदार आहे', उदयनराजेंची तुफान फटकेबाजी, VIDEO

मी 'अभी के अभीच' म्हणत उद्घाटन केले आहे, आता कोणीही काही करू द्या उद्घाटन झालेलं आहे.

मी 'अभी के अभीच' म्हणत उद्घाटन केले आहे, आता कोणीही काही करू द्या उद्घाटन झालेलं आहे.

मी 'अभी के अभीच' म्हणत उद्घाटन केले आहे, आता कोणीही काही करू द्या उद्घाटन झालेलं आहे.

सातारा, 18 जानेवारी : 'राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) सरकारच्या काळात साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजसह अनेक काम श्रेयवादामुळे रखडले असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे  खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी  केला आहे. तसंच, शरद पवारांना विनंती करून देखील कोणतेही लोकप्रतिनिधी ग्रेड सेपरेटरच्या (grade separator satara)भूमिपूजनावेळी आपल्या संकुचित विचार आणि नाकर्त्यापणामुळे आले नाही म्हणून उद्घाटन उरकले, असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितले.

साताऱ्यात काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले होते. त्यावरून बराच वाद पेटला होता. त्यानंतर आज पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजे यांनी चौफेर तोफ डागली.

'राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस काँग्रेस पक्षाचे सरकार होतं त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी श्रेय वादामुळे मेडिकल कॉलेज रखडले. फडणवीस सरकारच्या  काळात मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आणि चालना मिळाली. ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यासाठी राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांना बोलावे होते. पण कोरोनामुळे कुणीच यायला तयार नव्हते.  ग्रेड सेपरेटरच्या भूमिपूजनावेळी सर्व लोकप्रतिनिधींना शरद पवारांना विनंती करून सुद्धा संकुचित विचार किंवा नाकर्तेपणामुळे कोणीही आले नाही, असा आरोप उदयनराजेंनी केला.

'असं कुठं कायद्यात म्हटल आहे का मंत्री असेल तरच  उद्घाटन करायचे. मीसुद्धा खासदार आहे आणि असा तसा नाही भरपूर खाज असलेला खासदार आहे. ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करताना लोकांचा कौल घेतला आणि शटर उघडले', अशी टोलेबाजीही उदयनराजेंनी केली.

बाकीचे रथी-महारथी ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाला  आले असते तर भाषणं झाली असती आणि न पाहताच सांगितलं असतं योगदान किती ते? मी 'अभी के अभीच' म्हणत उद्घाटन केले आहे, आता कोणीही काही करू द्या उद्घाटन झालेलं आहे. जसं ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन झालं तशी वेळ आली तर मेडिकल कॉलेजचं पण उद्घाटन करणार,  कोण आडवं आलं तर आडवं करणार, असा इशाराही उदयनराजेंनी दिला.

First published:

Tags: Satara news