मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उदयनराजेंच्या चाहत्याने अमित शहांना लिहिलं रक्ताने पत्र, केली 'ही' मागणी

उदयनराजेंच्या चाहत्याने अमित शहांना लिहिलं रक्ताने पत्र, केली 'ही' मागणी

निलेशचा आज वाढदिवस असून वाढदिवसाच्या निमित्ताने रक्ताने पत्र लिहून अमित शहा विनंती केली आहे.

निलेशचा आज वाढदिवस असून वाढदिवसाच्या निमित्ताने रक्ताने पत्र लिहून अमित शहा विनंती केली आहे.

निलेशचा आज वाढदिवस असून वाढदिवसाच्या निमित्ताने रक्ताने पत्र लिहून अमित शहा विनंती केली आहे.

किरण मोहिते, प्रतिनिधी

सातारा, 10 फेब्रुवारी : भाजपचे नेते आणि साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेऊन मंत्री पद मिळावे यासाठी त्यांच्या एका चाहत्याने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहिले आहे.

राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले पराभव झाला. त्यानंतर उदयनराजे यांना राज्यसभेवर पाठवणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. परंतु, आता उदयनराजेंच्या एका चाहत्याचा बांध फुटला आहे. साताऱ्यातील रहिवासी असलेल्या निलेश जाधव या तरुणाने थेट भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहिलं आहे.  विशेष म्हणजे, निलेशचा आज वाढदिवस असून वाढदिवसाच्या निमित्ताने रक्ताने पत्र लिहून अमित शहा विनंती केली आहे.

काय लिहिलंय पत्रात?

माननीय श्री.अमित शाहजी (गृहमंत्री भारत सरकार)मी निलेश सुर्यकांत जाधव सांगू इच्छितो की, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर खासदार करुन मंत्रिपद मिळावे आणि छत्रपतीच्या गादीचा सन्मान करावा अशी विनंती करतो. -आपला निलेश जाधव

चंद्रकांत पाटलांनीही दिले होते संकेत

दरम्यान, राष्ट्रवादीला रामराम ठोकून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी दिल्लीत प्रवेश सोहळा पार पडला होता. परंतु, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला होता. उदयनराजेंच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला.

उदयनराजे भोसले यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, पक्षसंघटना त्यांची योग्य ती काळजी घेईल, अशी प्रतिक्रिया काही महिन्यांपूर्वीच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यामुळे उदयनराजेंना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले जाणार असल्याची चर्चा रंगली होती.

भाजपने आपली ऑफर उदयनराजे यांना कळवली आहे, याबद्दल ते काय निर्णय घेतात याची भाजप वाट पाहात आहे, अशी माहितीही समोर आली होती.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीतून बाहेर पडत असताना उदयनराजे भोसले यांनी काही अटींवर भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा पोटनिवडणुकीत जर पराभव झाला तर राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं जाईल, हे निश्चित होतं. परंतु, आता उदयनराजेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळही पडणार का हे पाहण्याचं ठरणार आहे.

First published:

Tags: Amit Shah, BJP, Satara, Udayan raje bhosle