महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उदयनराजे भोसले यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उदयनराजे भोसले यांची पहिली प्रतिक्रिया

उदयनराजे भोसले यांनी राज्यातील सत्तासंघर्षावरही भाष्य केलं आहे.

  • Share this:

किरण मोहिते, 3 नोव्हेंबर, सातारा : 'सरकार कोणतंही असलं तरी शासनाकडून मिळणारी मदत ही शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचली तरी फार उशिरा पोहचते. यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी इर्मा योजना लागू करावी, अन्यथा शेतकऱ्यांवर उपसमारीची वेळ येईल,' अशी भीती माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. तसंच यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्यातील सत्तासंघर्षावरही भाष्य केलं आहे.

'सत्तेचा तिढा सुटत नसेल तर रामदास आठवले हे म्हणाल्याप्रमाणे त्यांना तात्पुरते मुख्यमंत्री करा,' असा अनोखा सल्ला उदयनराजेंनी युती सरकारला दिला आहे. सातारा जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याच्या मागणीविषयी बोलताना उदयनराजे म्हणाले की, 'सर्वजण जवळचे आणि तज्ञ आहेत. त्यामुळे कुणाचं नाव घेणार. त्यापेक्षा थेट चिठ्ठ्या टाकून मंत्रिपद द्या.'

उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

- शेतकरी सधन कधी होणार? ज्यावेळी शेतकर्‍याला इंडस्ट्रिअल स्टेटस द्याल तेव्हा.

- शेतकर्‍यांसाठी इर्मा योजना लागू करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी.

- इर्मा योजना लागू केली तर शेतकऱ्यांचं कल्याण होईल.

- नैसर्गिक आपत्तीबाबत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.

- इर्मा योजना बाबत महाराष्ट्र राज्याने पुढाकार घेतल्यास इतर राज्यही ही योजना लागू करतील.

- नॅशनल डिझास्टर टास्क फोर्स माध्यमातून जे नियोजन होईल त्याची माहिती घेऊन यामधे मला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी करेन.

- लवकरच सत्ता स्थापन होईल.

- प्रत्येकाला खाते वाटपा बाबत अपेक्षा असते, त्यामुळे सत्ता स्थापनेस उशीर होत असावा.

- दोन्ही पक्षांना सल्ला देण्या इतका मी मोठा नाही, योग्य निर्णय घेतील.

परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 04:41 PM IST

ताज्या बातम्या