शरद पवारांच्या टीकेवर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, जाहीर सभेत म्हणाले...

शरद पवारांच्या टीकेवर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, जाहीर सभेत म्हणाले...

शरद पवार यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती.

  • Share this:

सातारा, 19 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार पाऊस कोसळत असताना सातारा इथं घेतलेल्या सभेनं राज्याचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियापासून सगळीकडेच या सभेची मोठी चर्चा झाली. या सभेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता उदयनराजे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'पवारसाहेब चूक तुमची नाही झाली. चूक तर आम्ही केली. इतके वर्ष आम्ही तुमच्या सोबत राहिलो ही आमची चूक होती का? महाराष्ट्र आजही सिंचनापासून वंचित राहिला, ही आमची चूक आहे का? दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली, या चुकीची कबुली कधी देणार?' असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला.

साताऱ्यात शरद पवारांचा झंझावात

शरद पवार यांची सातारा इथं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी सभा पार पडली. या सभेवेळी तिथं जोरदार पावसाने हजेरी लावली. पण पाऊस कोसळत असतानाही शरद पवार यांनी आपलं भाषण सुरुच ठेवलं. शरद पवारांच्या या कृतीने सभेला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या उर्जेसाठी ओळखले जातात. वयाच्या 79 व्या वर्षीही ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यामुळे अनेकजण आश्चर्यही व्यक्त करतात. त्यातच आता सातारा इथल्या शरद पवार यांनी पाऊस सुरू असतानाही केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे.

'लोकसभेला साताऱ्यातील उमेदवार निवडण्यात माझी चूक'

'लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातील उमेदवार निवडण्यात मी चूक केली. आता ही चूक आपल्याला दुरुस्त करायची आहे. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूक तुम्ही मोठ्या मताधिक्याने श्रीनिवास पाटील यांना निवडून द्या,' असं म्हणत शरद पवार यांनी उदयनराजेंवर टीकास्त्र सोडलं.

उदयनराजेंसमोर आव्हान

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सातारा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उदयनराजेंसमोर राष्ट्रवादीचं मोठं आव्हान आहे. त्यासोबतच त्यांची पक्षांतर करण्याची भूमिकाही लोकांना पटवून द्यावी लागणार आहे.

पाऊस नाही शरद पवार बरसले, भरपावसातलं UNCUT भाषण

First published: October 19, 2019, 5:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading