मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /udayanraje vs shivendraraje : उदयनराजे आणि शिंवेद्रराजेंच्या कार्यकर्त्यांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयातच जोरदार वादावादी

udayanraje vs shivendraraje : उदयनराजे आणि शिंवेद्रराजेंच्या कार्यकर्त्यांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयातच जोरदार वादावादी

सातारा खरेदी-विक्री संघासाठी अर्ज दाखल (Satara Buying and Selling Association election) झाल्यानंतर सोमवारी अर्ज छाननी झाली.

सातारा खरेदी-विक्री संघासाठी अर्ज दाखल (Satara Buying and Selling Association election) झाल्यानंतर सोमवारी अर्ज छाननी झाली.

सातारा खरेदी-विक्री संघासाठी अर्ज दाखल (Satara Buying and Selling Association election) झाल्यानंतर सोमवारी अर्ज छाननी झाली.

सातारा, 12 जुलै : साताऱ्याचे खासदार उदयनराजे (satara mp udayanraje bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे (satara mla shivendraraje bhosale) यांच्यातील वाद अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. निवडणुका असो किंवा निधी असो त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्यावरून दोघांमध्ये नेहमी आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असतात. दरम्यान दोन्ही राजेंमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.  सातारा खरेदी-विक्री संघासाठी अर्ज दाखल (Satara Buying and Selling Association election) झाल्यानंतर सोमवारी अर्ज छाननी झाली. यामध्ये आ. शिवेंद्रराजे व खा. उदयनराजे गटातील कार्यकर्ते भिडले. यामुळे साताऱ्यात काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. (Shivendra Raje and of UdayanRaje group clashed)

सातारा जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाची निवडणूक सुरू आहे. दरम्यान काल (दि.11) खरेदी-विक्री संघासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर छाननी झाली. या प्रक्रियेत आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे गटातील कार्यकर्ते भिडले. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातच या दोन गटांमध्ये हमरी - तुमरी व वादावादी झाली. आ. शिवेंद्रराजे गटाने खा. उदयनराजे गटाच्या सर्वच उमेदवारांविरोधात तक्रार केली. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर यावर सुनावणी झाली. यामध्ये दोन्ही गटाच्या वकीलांनी आपापली बाजू मांडली रात्री उशिरापर्यंत ही सुनावणी सुरूच होती.

हे ही वाचा : धक्कादायक! अवघ्या काही दिवसांच्या पावसाने मुंबईत 33 जणांचे बळी

कोरोनामुळे थांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे धुमशान सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी सातारा खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. अर्ज दाखल झाल्यानंतर सोमवारी छाननी झाली. खरेदी विक्री संघासाठी आ. शिवेंद्रराजे गटाकडून 17 जागांसाठी तर खा. उदयनराजे गटाकडून 14 जागांसाठी इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी बाबुराव शेळके यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी सुरू झाली.

यावेळी दोन्ही गटातील शेकडो कार्यकर्ते जिल्हा उपनिबंधक कार्यालय व परिसरात दाखल झाले होते. एका एका अर्जाची छाननी सुरू असताना आ. शिवेंद्रराजे गटाने खा. उदयनराजे गटाच्या प्रत्येक उमेदवाराचे रेकॉर्डच सादर केले. आ. शिवेंद्रराजे गटाच्या कार्यकर्त्यांनी खा. उदयनराजेंच्या गटातील कार्यकर्त्यांच्या उमेदवारी अर्जावर जोरदार आक्षेप घेतला. ज्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांचे संस्थेत शेअर्स नाहीत. तसेच काहींचे शेअर्स हे अपूर्ण आहेत.

हे ही वाचा : मंत्री -संत्री व्हा पण सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे, करेक्ट कार्यक्रम करणार : जयंत पाटील

याचबरोबर अनेकांनी संस्थेमार्फत त्यांनी खताची खरेदी वा विक्री केलेली नाही. त्यामुळे त्यांनी संस्थेशी व्यवहार झाला नसल्याची हरकत घेतली आहे. या मुद्द्यांमुळे हे सभासद अक्रियाशील असल्याचा आरोप आ. शिवेंद्रराजेंच्या गटाने केला. संचालक पदासाठी इच्छुक असलेल्या सभासदांनी पाच वर्षांत किमान एकदा तरी संघातून एकदा तरी खताची खरेदी किंवा विक्री करावी या नियमावर बोट ठेवून अर्जांच्या अपात्रतेची मागणी करण्यात आली. 

सत्ताधाऱ्यांकडून सर्वच अर्जांवर विविध मुद्द्यांवर आक्षेप घेतल्याने वातावरण तंग झाले. संस्थेच्या उपविधीच्या लू-फोल्सचा फायदा उठवत आ. शिवेंद्रराजे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खा. उदयनराजे गटातील कार्यकर्त्यांनीही विविध मुद्दे मांडत बाजू रेटण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकर्त्यांमध्येच हमरीतुमरी व वादावादी झाली. अखेर यावर दोन्ही गटांनी वकील बोलावून प्रत्येक अर्जावर सुनावणी घेण्याची मागणी केली.

छाननीमध्ये जोरदार वादावादी झाल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील झाले आहे. सायंकाळी 5 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी बापूराव शेळके यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये दोन्ही बाजूंच्या वकीलांनी जोरदार युक्तिवाद केला. वकीलांच्या युक्तिवादानंतर काय निर्णय देतात? याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या सुनावणीच्या निकालावर अपील करण्यासाठी खा. उदयनराजे गटाला तीन दिवसांचा अवधी आहे. या सर्व घडामोडींमुळे खरेदी विक्री संघाची निवडणूक रंगतदार होणार आहे.

First published:

Tags: Satara, Satara (City/Town/Village), Satara news