Home /News /maharashtra /

पदवी प्रमाणपत्रावर 'Covid-19' उल्लेख असणार का? उदय सामंताचा महत्त्वपूर्ण खुलासा

पदवी प्रमाणपत्रावर 'Covid-19' उल्लेख असणार का? उदय सामंताचा महत्त्वपूर्ण खुलासा

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या अभूतपूर्व गोंधळामुळे विद्यार्थी अजूनही संभ्रमावस्थेत आहे.

    मुंबई, 17 सप्टेंबर: कोरोनामुळे (coronavirus) यंदा विद्यार्थ्यांची मोठी समस्या  झाली आहे. त्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या अभूतपूर्व गोंधळामुळे विद्यार्थी अजूनही संभ्रमावस्थेत आहे. पदवीच्या परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, असं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रमाणपत्रावर कोविड-19 (Covid-19) असा उल्लेख नसणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे. हेही वाचा...पुण्यात बेवारस गाडीचं रहस्य उलगडलं, वडिलांच्या हत्येसाठी मुलानेच वापरली कार! पदवी प्रमाणपत्रात कोविड-19 चा उल्लेखाबाबत जो चुकीचा संदेश देईल त्यावर पोलीस कारवाई करणार असल्याचा इशारा उदय सामंत यांनी यावेळी दिला आहे. उदय सामंत यांनी सांगितलं की, 50 मार्कंची परीक्षा होईल. 90 टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. मागील वर्षांचे मार्क्स गृहीत धरण्यात येणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांची डिसेंबरमध्ये त्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा फॉर्मसाठी तीन दिवस मुदतवाढ... मुंबई विद्यापीठात 1 लाख 77 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. काही मुलांचे फॉर्म भरायचे राहिले आहे. त्यांना तीन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही. ऑनलाईन परीक्षेबाबत कुठल्या अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी सर्व विद्यापीठांन उदय सामंत भेट देत आहेत. उदय सामंत म्हणाले, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तयारी केली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड –19 च्या संदर्भाने काहीही उल्लेख नसेल. गतवर्षीप्रमाणे या वर्षीही पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, त्यामध्ये काहीही बदल असणार नाही. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, उदय सामंत हे सध्या राज्यातील विद्यापीठांचा दौरा करत आहेत. अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात उदय सावंत कुलगुरूंच्या आढावा बैठका घेत आहेत. उदय सामंत यांना धमकीचा फोन... उदय सामंत हे दोन दिवसांपूर्वी अमरावती दौऱ्यावर होते. त्याच्या पीएला एका विद्यार्थी संघटनेने धमकीचा फोन आला होता. अमरावती बाहेर निघून दाखवा, अशी फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकाराबाबत उदय सामंत यांनी पोलिसांना फोन करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. उदय सामंत यांना एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून भेटण्याची वेळ मागितली होती. सामंत त्यांना भेटणार होते. याच संघटनेच्या काही कार्यकर्त्यांकडून उदय सामंत यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट केल्याचे समोर आलं आहेय. त्यानंतर पोलिसांनी त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना न भेटण्याचे उदय सामंत यांना सांगितले. त्यानंतर त्याच कार्यकर्त्याकडून उदय सामंत यांच्या पीएला फोन करून अमरावती बाहेर निघून दाखवा, अशी फोनद्वारे धमकी देण्यात आली. हेही वाचा....असा शिक्षक होणे नाही! कोरोना महासाथीत विद्यार्थ्यांच्या दारासमोरचं आणली शाळा पोकळ धमक्यांना घाबरत नाही... आपण अशा पोकळ धमक्यांना घाबरत नसून ज्या विद्यार्थी संघटनांनी आपल्याशी चर्चा करायला समोर यावे, असे आवाहन उदय सामंत सावंत यांनी केले. काही विद्यार्थी संघटना केवळ आपल्या राजकीय पक्षाला खुश करण्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप करत आहे. हे योग्य नसल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले. काही सुधारणा असल्यास आम्ही त्याचा जरूर स्वीकार करू, असेही यावेळी उदय सावंत यांनी सांगितले.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या