मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Uday Samant vs Aditya Thackeray : उदय सामंत म्हणतात आमच्यावेळी हजारो लोक यायचे पण आदित्य ठाकरेंच्या सभेतून त्यांच्या कर्तुत्वाचा अपमान दिसला

Uday Samant vs Aditya Thackeray : उदय सामंत म्हणतात आमच्यावेळी हजारो लोक यायचे पण आदित्य ठाकरेंच्या सभेतून त्यांच्या कर्तुत्वाचा अपमान दिसला

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे कालपासून शिवसंवाद यात्रेनिमीत्त कोकण दौऱ्यावर आहेत. (Uday Samant vs Aditya Thackeray)

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे कालपासून शिवसंवाद यात्रेनिमीत्त कोकण दौऱ्यावर आहेत. (Uday Samant vs Aditya Thackeray)

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे कालपासून शिवसंवाद यात्रेनिमीत्त कोकण दौऱ्यावर आहेत. (Uday Samant vs Aditya Thackeray)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ratnagiri, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

रत्नागिरी, 18 सप्टेंबर : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे कालपासून शिवसंवाद यात्रेनिमीत्त कोकण दौऱ्यावर आहेत. (Uday Samant vs Aditya Thackeray) दरम्यान त्यांनी काल कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी सभा घेतल्या यानंतर ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यांच्यावर आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली. यानंतर कोकणातील बंडखोर नेते आमदार उदय सामंत आणि रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली. यावर उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या सभेला जमलेल्या गर्दीवरून टीका केली आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले कि, आम्ही आदित्य ठाकरेंसोबत असताना त्यांच्या सभांना पन्नास हजार शिवसैनिकांची गर्दी होत होती. परंतु काल झालेल्या रत्नागिरीतील सभेत चारशे खुर्च्या होत्या. त्यांना कॉर्नर सभा घ्याव्या लागत आहेत. हा आदित्य ठाकरेंच्या कर्तृत्वाचा अपमान आहे. मात्र, इतरांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेऊन आपण उत्तर देणार आहे. तेव्हा कोण किती निष्ठावान आहे. कोणी काय काय केले होते, हे उघडपणे सांगणार असल्याचा इशारा उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांचे नाव न घेता दिला आहे.

हे ही वाचारत्नागिरीत शिवसेनेच्या खासदाराविरोधात शिवसैनिक नाराज, आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार

उद्योगमंत्री उदय सामंत शनिवारी रत्नागिरी शहराच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प जाण्याला पूर्वीचे उद्योगमंत्रीच जबाबदार आहेत. त्यांनी हाय पॉवर कमिटीची सभा का घेतली नाही. त्यांच्या मिटिंग झाल्या होत्या, तर त्यामध्ये काय चर्चा झाली हे ते का सांगत नाहीत. मागच्या उद्योगमंत्र्यांनीच याचे उत्तर देणे आवश्यक होते. असे सांगताना मागील उद्योगमंत्र्यांच्या काळात काय काय ‘उद्योग’ झालेत यांची चौकशी लावणार असल्याचा इशारा ना. सामंत यांनी दिला आहे.

बारसू रिफायनरीला स्थानिक आ. राजन साळवी यांचा पाठिंबा आहे, मात्र खासदार विनायक राऊत विरोध करतात. 350 लाख कोटी रु.ची गुंतवणूक असलेल्या रिफायनरीत किती रोजगार उपलब्ध होतील. रोजगार देणार्‍या कारखान्याला येथे विरोध करायचा तर दुसरीकडे प्रकल्प गुजरातला गेला म्हणून बोंबा मारायच्या.

हे ही वाचा :  विनायक राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर शिवराळ भाषेत टीका, तर फडणवीसांचे केले कौतुक

आता शिवसेनेने बारसू रिफायनरी बाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. राजापूरच्या एका शिवसेना पदाधिकार्‍यानेच रिफानरीला पाठिंबा असताना खा. राऊत वरिष्ठांना दिशाभूल करणारी माहिती देते असल्याबाबत लेखी तक्रार केली आहे. यावरुन खा. राऊत हे स्थानिकांच्या बाजूने आहेत का हा प्रश्न असल्याचे उदय सामंत म्हणाले.

First published:

Tags: Aaditya Thackeray, Ratnagiri, Shiv Sena (Political Party)