नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून शिवसेना खासदाराचे यू-टर्न?

नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून शिवसेना खासदाराचे यू-टर्न?

हिंगोली आणि औंढा नागनाथ येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ नागरिकांनी मोर्चा काढला होता.

  • Share this:

कन्हैया खंडेलवाल, प्रतिनिधी

हिंगोली, 27 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात आंदोलनं सुरू आहे. अनेक ठिकाणी विरोधात तर कुठे समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहे. राज्यात काँग्रेससोबत सत्तेत आलेल्या शिवसेनेनंही आपली भूमिका तटस्थ ठेवली आहे. परंतु, सेनेचे खासदार नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून वादात सापडले आहे.

हिंगोली आणि औंढा नागनाथ येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ नागरिकांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला सेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी समर्थन दिलं होतं. एवढंच नाहीतर सेनेचे आमदार

संतोष बांगर हे स्वतः हजर होते. खासदार हेमंत पाटील यांचा पत्र आणि संतोष बांगर यांची मोर्चाला उपस्थिती असल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. परंतु, या पत्रावरून हेमंत पाटील यांनी यू-टर्न घेतलं आहे.

'मी कामानिमित्त मुंबईत असल्यामुळे मोर्चाला हजर नव्हतो. माझं या कायद्याला समर्थन असल्याचं पत्र हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या सहीने देण्यात आलं होतं, पण हे पत्र खोटे आहे', असा दावा पाटील यांनी केला.

हेमंत पाटील यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रारही दिली आहे. या तक्रारीत हेमंत पाटील यांचे कथीत पत्र बनावट असून असे कोणतेच पत्र दिलं नसल्याचं तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी देखील करण्याची पाटील यांनी मागणी केलीआहे. नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ खासदारांचं पहिलं पत्र खरं होतं की, आता दबाव वाढल्यामुळे खासदार हे यूटर्न घेतला आहे. याबाबत मात्र हिंगोलीमध्ये चर्चा रंगली आहे.

CAA कायद्याच्या समर्थनासाठी भाजपची रॅली, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

दरम्यान,  CAA कायद्याच्या समर्थनासाठी भाजप आणि काही संघटनांनी संविधान सन्मान मंचच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलं होतं. भाजप प्रणित सर्व संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. पण या मोर्चाला परवानगी नाकारल्याने या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं.

या मोर्चात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेची आत्तापर्यंती भूमिका ही घुसखोरांना मुंबईतून हाकललं पाहिजे अशी होती. बाळासाहेब ठाकरे यांनीही तीच भूमिका घेतली होती. मात्र, सत्तेसाठी हपापलेल्या शिवसेनेच्या तोंडाला सत्तेमुळे कुलूप लागलंय, अशी टीकाही त्यांनी केली. सावकरांचा अपमान करणाऱ्या पक्षांना जनता माफ करणार नाही, अशी टीकाही त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केली.

फडणवीस म्हणाले,  CAAच्या मुद्यावरून काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी अप प्रचार सुरू केलाय. देशात आणि समाजात हिंसाचार व्हावा असाच त्यांचा उद्देश होता. या मुद्यावरून त्यांनी पेटवा पेटवी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आलं नाही. मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याच्या मुद्यावरूनही ते पोलिसांवर चांगलेच भडकले. हिंसाचार करणाऱ्यांना मोर्चाची परवानगी दिली जाते आणि आम्ही संविधानाचा सन्मान करणारे असताना परवानगी नाकारली जाते अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

First published: December 27, 2019, 9:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading