Home /News /maharashtra /

रुग्णालयाच्या दारातच डॉक्टरावर गोळीबार, यवतमाळ हादरलं

रुग्णालयाच्या दारातच डॉक्टरावर गोळीबार, यवतमाळ हादरलं

 हनुमंत धर्मकारे रुग्णालयातून घरी निघाले असता अचानक दोन तरुण दुचाकीवर आले आणि त्यांनी धर्मकारे यांच्यावर बेछुट गोळीबार केला.

हनुमंत धर्मकारे रुग्णालयातून घरी निघाले असता अचानक दोन तरुण दुचाकीवर आले आणि त्यांनी धर्मकारे यांच्यावर बेछुट गोळीबार केला.

हनुमंत धर्मकारे रुग्णालयातून घरी निघाले असता अचानक दोन तरुण दुचाकीवर आले आणि त्यांनी धर्मकारे यांच्यावर बेछुट गोळीबार केला.

 यवतमाळ, 11 जानेवारी : राज्यात कोरोनाने उद्रेक झाला आहे. आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. डॉक्टर, आरोग्य सेवक पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. पण, दुसरीकडे यवतमाळमध्ये (Yavatmal) एका रुग्णालयात डॉक्टरावर (doctor) गोळीबाराची  (gun fire) घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यच्या उमरखेड येथिल श्री राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात (Uttarwar Hospital in Yavatmal)  कार्यरत असलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वाराने गोळीबार केल्याची घटना ५ वाजेच्या दरम्यान घडली.  डॉक्टर धर्मकारे उमरखेड-पुसद रोडवरील गोरखनाथ हॉटेलच्या समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने डॉक्टरवर चार गोळ्या झाडल्या. या गोळीबारामुळे धर्मकारे जखमी झाले होते, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे उमरखेडच्या शासकीय रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Varanasi | बनारसला जायचे असेल तर 'या' दिवसातच भेट द्या, जाणून घ्या कारण) डॉ. हनुमंत धर्मकारे मागील ७ वर्षांपासून उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांचा उमरखेड बसस्थानकाच्या समोर खाजगी बाल रुग्णालय आहे. गेल्या ७ वर्षाच्या काळात त्यांची कारकीर्द ही अतिशय सर्वसमावेशक राहिलेली आहे. या शिवाय कुठल्याही वादाच्या विषयात त्यांचे नाव चर्चेत आले नाही असे असताना आज अचानक त्यांच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबार केला यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. ('कटप्पा' फेम सत्‍यराज यांनी केली कोरोनवार मात, समोर आली हेल्थ अपडेट) शहरातील उत्तरवार रुग्णालयाच्या नजीकच असलेल्या गोरखनाथ हॉटेल येथे चहा पिण्यासाठी बैठक असते. सायंकाळी ५ वाजताच सुमारास आपल्या मोटर सायकलने ते त्यांच्या खाजगी दवाखानाकडे जात असताना एक अज्ञात युवकाने त्यांच्यावर बंदूक रोखून छातीमध्ये गोळ्या झाडल्याय त्या वेळी आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अज्ञात युवक त्याच्या शाईन गाडीने भरधाव वेगाने पसार झाला. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला डॉक्टरला नागरिकांनी उचलून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना शहरात वार्‍यासारखी पसरली यावेळी नागरिकांनी येथील शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली. उमरखेड शहरात सध्या पोलीस  बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, असे असताना सुद्धा भर रस्त्यावर हा गोळीबार झाल्याने शहरतील कायदा व सुव्यवस्था यावर सामान्य नागरिक रोष व्यक्त करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Yavatmal

पुढील बातम्या