डोंबिवली, 11 जानेवारी : ताडीचे सेवन केल्याने दोन तरुणांचा मृत्यू (2 youth died after overdrinking tadi) झाल्याची घटना डोंबिवली शहरात (Dombivli City) घडली आहे. कोपर भागात राहणाऱ्या सचिन पाडमुख (Sachin Padmukh) आणि स्वप्नील चोळके (Swapnil Cholake) या तरुणांचा यात मृत्यू झाला आहे. विष्णू नगर पोलिसांनी या प्रकरणी ताडी विक्रेता विरोधात गुन्हा दाखल करीत ताडी विक्रेत्याचा शोध सुरू केला आहे. (Dombivli 2 youths died after drinking tadi)
मृत्यू नेमका कशामुळे?
विषारी ताडीमुळे हा मृत्यू झाल्याची आधी चर्चा होती मात्र ताडीच्या अतिसेवनामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता. सचिन आणि स्वप्नील हे दोघे मित्र सोमवारी सायंकाळी आपल्या मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरमध्ये ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन आणि स्वप्नील घरी परतत असताना रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला.
वाचा : मनसे महिला पदाधिकाऱ्यांची बांधकाम व्यवसायिकाला शिवीगाळ अन् मारहाण, नाशकातील VIDEO VIRALताडी विक्रेत्यावर कारवाईची मागणी
त्याच्या मित्रांनी दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात विक्रेता रवी भटने विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. मयत सचिनच्या कुटुंबीयांनी संबंधित ताडी विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वाचा : शरद पवारांची अॅलर्जी आहे का? गोपीचंद पडळकरांना छगन भुजबळांचा थेट सवालचौघे मित्र ताडी पिण्यासाठी गेले
ताडी पिऊन इतर दोघांची तब्येत सुद्धा खालावली होती, मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या ताडी विक्री केंद्रावर चार जण ताडी पिण्यासाठी गेले होते, त्यातील सचिन आणि स्वप्नील या दोघांनी ताडीचे अतिसेवन केल्यामुळे त्रास झाला. त्यानंतर त्यांचा मित्र कुऱ्हाडे याने या दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
दोन्ही मृतकांचे शवविच्छेदन केले असता ताडीचे अति सेवन केल्यामुळे त्यांना झोप लागली आणि त्यात त्यांच्या हृदयावर ताण येऊन त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली असे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.