मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

साताऱ्यातील कृष्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेले 2 युवक बुडाले

साताऱ्यातील कृष्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेले 2 युवक बुडाले

बुडालेले दोन्ही तरूण मूळचे कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती आहे.

बुडालेले दोन्ही तरूण मूळचे कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती आहे.

बुडालेले दोन्ही तरूण मूळचे कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती आहे.

  • Published by:  Akshay Shitole
किरण मोहिते, 8 फेब्रुवारी : साताऱ्यातील कृष्णा नदीत पोहोचण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. बुडालेल्या दोघापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे. बुडालेले दोन्ही तरूण मूळचे कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती आहे. आज दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली. साताऱ्यातील कोडोली हद्दीतून जाणार्‍या कृष्णा नदीत आज पोहायला गेलेले दोन युवक बुडाले. याबाबत माहिती मिळताच शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम घटना स्थळी पोहचली. या टीमने सागर नावाच्या युवकाचा मृतदेह बाहेर काढला. मात्र बुडालेल्या दुसऱ्या युवकाचा शोध घेण्यात रेस्क्यू टीमला अद्याप यश आलेलं नाही. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम सध्या दुसऱ्याचा तरुणाचा शोध घेत आहे. दरम्यान, कृष्णा नदीत पोहताना बुडालेला दोन्ही तरुण रोजगाराच्या शोधात कर्नाटकातून साताऱ्यात आले होते. कृष्णा नदीपासून जवळच असलेल्या एका खासगी कंपनीत हे तरूण काम करत होते. आज शनिवार असल्याने दोघांचीही सुट्टी होती. याच सुट्टीत पोहोचण्याचा आनंद लुटण्यासाठी दोन्ही युवकांनी कृष्णा नदी गाठली. मात्र काही वेळातच हे तरूण बुडाल्याची माहिती समोर आली. पाच वर्षांपासून मुंबई पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात पोहण्यासाठी नदीत गेलेले हे तरूण नेमके कशामुळे बुडाले, याची माहिती अद्याप समोर आली नाही. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
First published:

पुढील बातम्या