मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Photoshoot करुन परतणाऱ्या युवकांवर काळाचा घाला; दोघांचा मृत्यू, घटनेचा VIDEO आला समोर

Photoshoot करुन परतणाऱ्या युवकांवर काळाचा घाला; दोघांचा मृत्यू, घटनेचा VIDEO आला समोर

Buldhana accident CCTV: बुलडाण्यातील दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Buldhana accident CCTV: बुलडाण्यातील दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Buldhana accident CCTV: बुलडाण्यातील दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 21 जुलै: फोटोशूटसाठी गेलेले तरुण पुन्हा घराकडे परतत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात (Major accident) झाला. या अपघातात दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. बुलडाण्यातील चिखली एमआयडीसी (Chikhali MIDC) परिसरात ही घटना घडली आहे. दोन तरुणांच्या मृत्यूमुळे (2 youths died) परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बुलडाण्यातील चिखली येथे एमआयडीसी परिसरात फोटोशूट करून चिखलीकडे परत येत असताना अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रेणुका पेट्रोलपंपासमोर घडली आहे. हा अपघात जवळलील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

खळबळजनक! दोन दिवसांत 2 ATM सेंटरमध्ये स्फोट; रांजणगाव एमआयडीसी घटनेचा CCTV आला समोर

शेख दानिश बिबन उर्फ मोनू (18), फिरोज सलीम खान (17) आणि सातगांव भुसारी येथील रोहित प्रदीप कंकाळ (19) हे तिघेजण पल्सर बाईकने फोटोशूटसाठी गेले होते. चिखली एमआयडीसीत फोटोशूट झाल्यावर ते घराकडे परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला.

फोटोशूट करून हे तिघे मित्र चिखलीकडे परत येत असताना चिखली-देऊळगावराजा महामार्गावरीवरील स्थानिक रेणुका पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडणाऱ्या जे.सी.बी. मशीनला दुचाकीची जबर धडक बसली. यामध्ये दुचाकीचालक शेख दानिश बिबन उर्फ मोनू रा. हिदायत नगर माळीपुरा, चिखली याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर याच भागातील रहिवासी फिरोज खान सलीम खान (17) हा देखील औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Buldhana news, Cctv