• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • बुलडाण्यात मुसळधार पावसात दोन तरुणांसह महिला गेली वाहून, एकाचा मृतदेह सापडला तर दोघांचा शोध सुरू

बुलडाण्यात मुसळधार पावसात दोन तरुणांसह महिला गेली वाहून, एकाचा मृतदेह सापडला तर दोघांचा शोध सुरू

Heavy rain lashes, 3 swept away in flood: राज्याच्या विविध भागांत कजोरदार पाऊस सुरू आहे.

 • Share this:
  राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 8 सप्टेंबर : राज्यातील बहुतांश भागात गेल्या दोन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rainfall in Maharashtra) पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नदी- नाले ओसंडून वाहू लागले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस (Buldhana rain) पडत असून पुराच्या पाण्यात तिघे जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून नदी नाल्यांना पुर आल्याने जिल्ह्यातील 3 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड येथील युवक आदित्य संतोष गवई हा नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. तर सिंदखेडराजा येथील मंगला शिंगणे ह्या देखील गावानजीक आलेल्या नाल्याच्या पुरात वाहून गेल्या. यासोबतच निमगाव येथील ओम गव्हाळे हा विद्यार्थी देखील पूर्णा नदी पात्रात वाहून गेला. त्यातील आदित्य गवई यांचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध सुरू आहे. भाजपचा मास्टर प्लान, देवेंद्र फडवणीसांवर दिली मोठी जबाबदारी ढगफुटीसदृश्य परिस्थिती बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून पावसाने जणू काही मुक्कामच ठोकला आहे जिल्ह्यातील 13 ही तालुक्यांत पावसाने हाहाकार माजविला असून छोटे मोठे प्रकल्प भरले आहेत. तर नदी नाल्यांना महापूर आला आहे. जिल्ह्याची पावसाची परिस्थिती बघता ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. घरांची पडझड बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा आणि धामणगाव बडे या गावात तर गावाला जोडणारा रस्ता जलमय झाला. तर काहींच्या घरात देखील पाणी शिरले. तसेच अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे कधी न पहावयास मिळणार पाऊस यावेळी बुलडाणा जिल्ह्यात दिसून आला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पावसाचा तैमान सुरूच आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: