दिवाळीला गालबोट! दापोलीत पर्यटनासाठी आलेले दोन तरुण समुद्रात बुडाले, एक वाचला

दिवाळीला गालबोट! दापोलीत पर्यटनासाठी आलेले दोन तरुण समुद्रात बुडाले, एक वाचला

दापोली तालुक्यातील पाळंदे बीचवर पर्यटनासाठी महाड येथून आलेल्या तरुणांवर काळाचा घाला...

  • Share this:

रत्नागिरी, 14 नोव्हेंबर: ऐन दिवाळीच्या दिवशीच कोकणावर शोककळा पसरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या समुद्रात तिघे बुडाल्याची घटना घडली. या दोघांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आलं आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने दापोलीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाळंदे बीचवर महाड येथून आलेल्या आठ पर्यटकांपैकी तीन तरुण बुडाले. त्यातील दीपक सुतार आणि प्रसंजीत तांबे या दोघांचा मृत्यू झाला आहे. यश पवार सुदैवानं वाचला असून त्याचावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा..सलग चौथ्यांदा आमदार झाल्यानंतरही या नेत्याकडे नाही पक्क घर, आजही हाकतात नांगर

कोरोनामुळे घरी कंटाळले होते तरुण...

पाळंदे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी महाड सुतारवाडी येथील श्रेयश पवार, सोहम सकपाळ, राहुल पवार, सोहम सोंडकर, यश पवार, निखिल कोळंबेकर, प्रसंजीत तांबे, दीपक सुतार हे 8 मित्र आज, शनिवारी सकाळी 11 वाजता पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले होते. त्यातील सर्व मित्र समुद्रातील पाण्यामध्ये उतरले. परंतु त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच आज समुद्राला भरती असल्यामुळे पोहता पोहता या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तीन मित्र समुद्रामध्ये बुडू लागले. नेमकं काय होतंय याचा अंदाज येण्याअगोदरच यातील दोन मित्र दिसेनासे झाले. परंतु काही वेळाने यातील यश पवार भरतीच्या जोरदार लाटेसोबत किनाऱ्यावर आला. त्याला तातडीनं स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवलं. सुदैवानं त्याचे प्राण वाचले.

दीपक सुतार याचा काही वेळाने मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला. मात्र, यातील प्रसंजीत तांबे हा तरुण बेपत्ता झाला होता. सायकांळी प्रसंजीतचाही मृतदेह सापडला. स्थानिक नागरिकांनी यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मध्ये उपचार सुरू आहेत.

महाड येथून पर्यटनासाठी आलेले सर्व तरुण 16 ते 18 वयोगटातील आहेत. सर्व तरुण नुकतेच 10 व 12 वी ची परीक्षा पास झाले आहेत. मृत दीपक सुतार हा फर्नीचरचे काम करीत होता.

दरम्यान, गेल्या आठवड्यात मुंबईजवळील समुद्रात मच्छीमारांची एक बोट बुडाली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली झाली नाही. बोटीवरील सर्व 6 खलाशांनी तब्बल 2 तास पोहून स्वत:चा जीव वाचवला. जयगड येथून मुंबईकडे जाणारी श्री सोमनाथ नावाची मच्छीमार बोट 5 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास पालशेत किनाऱ्यावर बुडाली होती. या बोटीवरील 6 खलाशी व 1 तांडेल यांनी बोट वाचवण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला. मात्र, नाईलाज झाल्याने समुद्रात उड्या टाकत त्यांनी किनारा गाठला. 2 तासांनी ते किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले.

हेही वाचा..कोरोनामुळे फुफ्फुसांमध्ये होतात रक्ताच्या गुठळ्या, संशोधनातून नवीन माहिती समोर

2 महिन्यांपूर्वी झालेल्या वादळाच्यावेळी मुंबईतील श्री सोमनाथ ही मच्छीमार नौका जयगड किनाऱ्यावर येऊन पोहोचली होती. गेले 2 महिने याच परिसरात ही नौका मच्छिमारी करत होती. ही नौका बुधवारी मुंबईच्या दिशेने निघाली होती. पालशेत बंदर परिसरातून ही नौका पुढे जात असताना पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास बोटीत पाणी भरू लागले. संकट ओळखून तांडेलने नौका वेगाने किनाऱ्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी वाढतच गेले. अखेर पालशेत बंदरापासून खोल समुद्रात बोट बुडाली.

Published by: Sandip Parolekar
First published: November 14, 2020, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading