पतंगबाजी जिवावर बेतली, वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

पतंगबाजी जिवावर बेतली, वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

पतंग उडवताना विजेच्या तारेला चिटकून एका 18 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  • Share this:

हरीश दिमोटे आणि लक्ष्मण घाटोळे, प्रतिनिधी

अहमदनगर, 15 जानेवारी : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजी करताना राज्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात पतंग उडवताना विजेच्या तारेला चिटकून एका 18 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरुणाला वाचवणारे दोघे जणही यात जखमी झाले आहेत.

राहाता शहरातील शनी मंदिर रोडवर घरावर पतंग उडवत असताना विजेच्या तारेला चिटकून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 12 वीत शिकणारा तुषार चंपालाल वाडीले आणि त्याचे मित्र घरावर पतंग उडवत होते. अगदी जवळून जाणाऱ्या विजेच्या तारेवर अडकलेली पतंग काढण्याच्या प्रयत्नात तुषार विजेच्या तारेला चिटकला. हे बघून त्याच्या सोबतच्या दोघांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ही यात जखमी झाले आहेत.

दुर्दैवाने तुषार वाडीले याचा विजेच्या जबर धक्याने मृत्यू झाला आहे. जखमी तरूणांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

इमारतीवरुन पडून मृत्यू

तर नाशिकमध्ये पतंग उडवताना एका मुलाचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्याहुन पडल्यानं 16 वर्षीय सुफिया निजाम कुरेशी मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. नाशिकच्या जेल रोड परिसरात ही घटना घडली आहे.

========================

First published: January 15, 2019, 8:22 PM IST

ताज्या बातम्या