Home /News /maharashtra /

पाण्यात उतरू नका म्हणून सांगितलं होतं, पण तरीही 2 तरुणांनी समुद्रात पोहोयला गेले आणि...

पाण्यात उतरू नका म्हणून सांगितलं होतं, पण तरीही 2 तरुणांनी समुद्रात पोहोयला गेले आणि...

या पर्यटकांना किनार्‍यावरील जीवरक्षकांनी समुद्रात न उतरण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या.

रायगड, 18 सप्टेंबर : जीवरक्षकाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करुन पाण्यात उतरल्याने दोन पर्यटकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली. मुरुडमधील (murud) प्रसिद्ध काशिद समुद्रात (murud kashid beach) बुडून दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोहायला उतरलेल्या या तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लालटू नस्कर (वय 28) व पालटू सूत्रधर (वय 38) अशी बुडालेल्या पर्यटकांची नावे आहेत.  दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हे दोघे पर्यटक मूळचे कोलकाता येथील असून, पुण्यात ते कामाला होते. काम करीत असलेल्या ठिकाणाच्या अन्य सहकारी कर्मचार्‍यांसह दोन बसेसमधून हे पर्यटक काशिदला फिरायला आले होते. या पर्यटकांना किनार्‍यावरील जीवरक्षकांनी समुद्रात न उतरण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. Covid Test करताना किट अडकलं घशात; अर्धा तास तडफडतच महिलेचा मृत्यू त्यामुळे एका बसमधील पर्यटक समुद्राच्या पाण्यात उतरले नाहीत. मात्र सूचना करुनही दुसर्‍या बसमधील लालटू नस्कर व पालटू सूत्रधर हे समुद्राच्या पाण्यात उतरले. या दोघांनाही समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने, ते पाण्यात बुडाले. हे दोघेही पाण्यावर तरंगत असल्याची बाब जीवरक्षक अमोल कासार यांच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना पाण्याबाहेर काढत  किनार्‍यावर आणले. मात्र, दोघेही बेशुद्धावस्थेत होते. Home Loan साठी अप्लाय करताना अजिबात विसरू नका हे 6 मुद्दे, सहजपणे मिळेल कर्ज जीवरक्षक अमोल कासार यांनी एटीव्ही बाईकवाले आणि घोडेचालकांच्या मदतीने तातडीने दोघांनाही बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, जीवरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांनी सूचना करुनही उत्साहाच्या भरात समुद्रात उरतणे या पर्यटकांच्या जीवावर बेतले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या