मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sangli: सिगरेट आणायला उशीर झाल्यानं मित्राला दगडानं ठेचलं, मृतदेहाचे तुकडे केले अन्...

Sangli: सिगरेट आणायला उशीर झाल्यानं मित्राला दगडानं ठेचलं, मृतदेहाचे तुकडे केले अन्...

सिगरेट आणायला उशीर झाल्यानं  दोन जणांनी आपल्या जीवलग मित्राची निर्घृण हत्या केली आहे. (फोटो-प्रभात)

सिगरेट आणायला उशीर झाल्यानं दोन जणांनी आपल्या जीवलग मित्राची निर्घृण हत्या केली आहे. (फोटो-प्रभात)

Murder in Sangli: मद्यपार्टी सुरू असताना, सिगरेट आणायला उशीर झाल्यानं (Being late to bring cigarettes) दोन जणांनी आपल्या जीवलग मित्राची निर्घृण हत्या केली आहे.

सांगली, 14 ऑगस्ट: सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरज (Miraj) तालुक्यात मैत्रीला  काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. मद्यपार्टी सुरू असताना, सिगरेट आणायला उशीर झाल्यानं (Being late to bring cigarettes) दोन जणांनी आपल्या जीवलग मित्राची निर्घृण हत्या (Friend's Murder in Sangli) केली आहे. आरोपींनी कोयत्यानं वार करत मित्राचा खून केला आहे. निर्दयी आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मृतदेहाचे तुकडे करून कुपननलिकेत टाकले आहेत. मयत तरुणाच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघा आरोपी मित्रांना अटक (2 Arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास मिरज पोलीस करत आहेत.

दत्तात्रय झांबरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर अमोल खामकर आणि सागर सावंत अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मृत दत्तात्रय झांबरे मागील काही दिवसांपासून बेपत्ता होता. याप्रकरणी मयत तरुणाच्या नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत असता, दोन आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा-बुडणाऱ्या जिजाला वाचवण्याऐवजी मेहुणा गेला पळून, दारूच्या नशेत नात्याचाही विसर

मृत दत्तात्रय हा 28 जुलै रोजी त्याचे मित्र अमोल आणि सागर यांच्यासोबत होता. तेव्हापासूनच दत्तात्रय गायब असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. यानंतर दत्तात्रयचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी मयत तरुणाच्या मित्रांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता, हत्येचं गूढ उलगडलं आहे. दारू पिल्यानंतर शिवीगाळ केल्याच्या रागातून आरोपींनी ही हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

हेही वाचा-2 कोटींच्या लाच प्रकरणातील फिर्यादीच निघाला खुनी; मित्राच्या हत्येचं उलगडलं गूढ

त्या रात्री नेमकं काय घडलं?

प्रभातने दिलेल्या वृत्तानुसार, 28 जुलै रोजी मृत दत्तात्रयसह आरोपी अमोल आणि सागर एकत्र आले होते. त्यांनी जोरात मद्यपार्टी केली होती. पार्टी सुरू असताना आरोपींनी दत्तात्रयला सिगरेट आणायला पाठवलं. पण दत्तात्रयला सिगरेट आणण्यासाठी उशीर झाला. यातून वादाला तोंड फुटलं. यामुळे आरोपी अमोल आणि सागरनं दत्तात्रयवर कोयत्यानं सपासप करत दगडानं डोकं ठेचलं. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी दत्तात्रयच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुपनलिकेत टाकले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन्ही मित्रांना अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Murder, Sangli