काळ बनून अंगावर आली काळी कार... दोघींचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर

काळ बनून अंगावर आली काळी कार... दोघींचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर

भरधाव कारने तीन महिलांना चिरडले असून त्यापैकी दोघींचा जागेवरच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाली आहे.

  • Share this:

औरंगाबाद,8 मार्च: भरधाव कारने तीन महिलांना चिरडले असून त्यापैकी दोघींचा जागेवरच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाली आहे. औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील राम नगर परिसरातील घटना शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. अपघात खूप भीषण होता. तीन महिलांना चिरडल्यानंतर कारने रस्त्याच्या शेजारी असलेल्या टपरीला जोरदार धडक दिली. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, जालना रोडवरील धूत हॉस्पिटलसमोर एका भरधाव कारने तीन महिलांना उडवले. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर सामान्य घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पावणेपाचच्या सुमारास जालना रोडवरील म्हाडा कॉलनीजवळ झाला. तुळसाबाई दामोदर गायकवाड (वय 70) आणि आशामती विष्णु गायकवाड (वय 40, दोघीही रा. देवठाणा, ता. मंठा, जि. जालना) अशी मृत महिलांची नावे आहेत. अहिल्याबाई दादाराव गायकवाड असं जखमी महिलेचं नाव आहे. लग्न समारंभासाठी या महिला याठिकाणी आल्या होत्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी केली होती.

हेही वाचा..राज यांचे व्यंगचित्रातून ताशेरे, म्हणाले.. लोकांनी रामराज्य मागितलं, राममंदिर नव्हे

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर जिल्ह्यात ट्रॅक्टर आणि स्कॉर्पियोच्या भीषण अपघातात तब्बल 11 प्रवासी जागीच ठार झाले आहेत. भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर आणि वेगात असलेली स्कॉर्पियो यांच्यात जोरदार धडक झाली. अपघात एवढा भीषण होती की स्कॉर्पियोचा चक्क्नाचूर झाली आहे. मुजफ्फरपूर इथल्या कांटी येथे अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व नागरीक हे जवळच्या हाथौडी गावचे रहिवाशी आहेत. या अपघातात 7 जण जागीच ठार झालेत तर 4 जणांना उपारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा..धक्कादायक! पुलवामा हल्लेखोरांनी Amazonवरून मागवलं स्फोटकांचं साहित्य, NIA च्या तपासात खुलासा

घटनेनंतर अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी येऊन घटनास्थळी पंचनामा केला असून ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. पहाटे हा अपघात झाल्यामुळे ड्रायव्हरला डुलकी लागली होती का? अशीही शक्यता व्यक्त केली जाते. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व हे एकाच कुटुंबातले आहेत अशी माहिती दिली जाते आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा पोलिसांनी दिला नाही. या घटनास्थळावर या आधीही काही अपघात झाले आहेत. त्यामुळे इथे तातडीने उपयायोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली.

First published: March 7, 2020, 6:54 PM IST

ताज्या बातम्या