मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकमेकींचा हात सुटला अन् दोघींनी गमावला जीव; नांदेडमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

एकमेकींचा हात सुटला अन् दोघींनी गमावला जीव; नांदेडमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

शेतात दिवसभर काम करून घरी परतत असताना, दोन वयोवृद्ध महिलांवर काळानं घाला घातला आहे. (फोटो- दिव्य मराठी)

शेतात दिवसभर काम करून घरी परतत असताना, दोन वयोवृद्ध महिलांवर काळानं घाला घातला आहे. (फोटो- दिव्य मराठी)

Nanded News: शेतात दिवसभर काम करून घरी परतत असताना, दोन वयोवृद्ध महिलांवर काळानं घाला घातला आहे.

  • Published by:  News18 Desk

नांदेड, 25 ऑगस्ट: नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील शिवणी याठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात दिवसभर काम करून घरी परतत असताना, दोन वयोवृद्ध महिलांवर काळानं घाला घातला आहे. शेतातून घरी परतत असताना गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्यानं यात दोन महिला वाहून गेल्या (2 Women flow in Flood Water) आहेत. या दोघींचा मृतदेह (2 women died in flood)घटनास्थळावरून 1 किमी अंतरावर आढळून आला आहे. दुर्दैवी घटनेत एकाच वेळी दोन महिला वाहून गेल्यानं शिवणी गावात शोककळा पसरली आहे.

प्रेमलाबाई लच्छन्ना तमलवाड (वय -60) आणि मह अबी रज्जाक (वय- 61) अशी महिलांची नावं आहेत. संबंधित दोन महिला आपल्या अन्य काही महिला मंडळींसोबत मंगळवारी शेतात निंदणी करण्यासाठी शिवणी शिवारात गेल्या होत्या. दुपारपर्यंत त्यांनी नेहमीप्रमाणे काम केलं. त्यानंतर दुपारचं जेवण उरकून त्या पुन्हा कामाला लागल्या होत्या. पण साडेतीनच्या सुमारास शिवणी परिसरात अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे या सर्व महिला शेतातच एका आडोशाला थांबला.

हेही वाचा-भाजपच्या युवा नेत्याची आत्महत्या, प्रेमात धोका मिळाल्याचं कारण आलं समोर

पण बराच वेळ होऊनही पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे त्यांनी कोसळणाऱ्या पावसात घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाच महिला शेतातून शिवणी गावच्या दिशेनं निघाल्या. पण शिवणी परिसरातील डोंगरावर झालेल्या जोरदार पावसामुळे शिवणी गावानजीक असणाऱ्या नाल्याला पूर आला होता. या नाल्यात वेगानं पाणी वाहत होतं. अशात स्थितीत संबंधित पाच महिलांनी वाहत्या पाण्यातून नाला पार करण्याचं ठरवलं.

हेही वाचा-...म्हणून प्रेयसीचं हात-पाय अन् मुंडकं केलं धडावेगळं; पुण्याला हादरवणारी घटना

यासाठी या पाचही महिलांनी एकमेकींच्या हाताला पकडून त्यांनी ओढा पार करण्याचा प्रयत्न केला. या पाच महिलांपैकी तीन महिला दुसऱ्या बाजूला ही गेल्या. पण दोन महिला अद्याप वाहत्या प्रवाहातच होत्या. तेवढ्यात त्यांचा हात सुटला. अन्य महिलांना काही कळायच्या आत संबंधित दोन महिला पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत वाहून गेल्या. घटनास्थळापासून जवळपास 1 किमी अंतरावर या दोन्ही महिलांचे मृतदेह आढळले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर शिवणी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

First published:

Tags: Nanded