मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तरुणीच्या अकाऊंटवरून फ्रेण्ड रिक्वेस्ट आली आणि गुरुजींचा घात झाला, बायकोचे दागिनेही मोडावे लागले!

तरुणीच्या अकाऊंटवरून फ्रेण्ड रिक्वेस्ट आली आणि गुरुजींचा घात झाला, बायकोचे दागिनेही मोडावे लागले!

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे, 24 जानेवारी : धुळ्यातील एका शिक्षकाला दोन महिलांनी 3 लाख 27 हजाराचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धुळ्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय देसले (वय 47) असं फसवणूक झालेल्या धुळे शहरातील वलवाडी शिवारात राहणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. हॅलो फ्रेंड म्हणत एका तरुणीने आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि चॅटिंगद्वारे मैत्री वाढवत विश्वास संपादन केला. 'मी अफगाणिस्तानच्या लष्करात अधिकारी असून मला मोठा खजिना मिळाला आहे, ज्याची किंमत 4.3 मिलियन एवढी आहे. मी त्यातील 30 टक्के रक्कम तुम्हाला पाठवते,' असं सांगून या शिक्षकाची फसवणूक करण्यात आली. संजय देसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. संजय यांना त्यांच्या फेसबुक अकाउंटवर इलिस मिशेल या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर आधी फेसबुकवर आणि नंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ओळख वाढली आणि मैत्री झाली. इलिसने संजय यांच्याशी मैत्रीतून विश्वास संपादन केला. आपण अफगाणिस्तान लष्करात असून आम्हाला मोठं घबाड सापडलं असल्याचं इलिसने संजय यांना सांगितलं. माझ्या वाट्याला 4.3 मिलियन डॉलर्स आले असून यातील 30 टक्के रक्कम मैत्री म्हणून मी तुम्हाला देणार असल्याचं तिने सांगितलं. हेही वाचा - भारतीय चलनात ही रक्कम तब्बल 31 कोटी 40 लाखाच्या आसपास जात असल्याने संजय देसले यांचे डोळे विस्फारले. त्यानंतर एका बॉक्समध्ये नोटांचे बंडल पॅक करण्याचा व्हिडिओ तसंच ब्रिटिश एअरवेज कंपनीची कुरीअरची पावती इलिसने संजय देसले यांना ई-मेलने पाठवली. इलिसने अफगाणिस्तानातून पैसे पाठवल्याच्या व्हिडिओ आणि ब्रिटिश एअर कुरियरची पावतीचा ईमेल आल्यानंतर चार दिवसांनी संजय देसले यांना मुंबईहून कस्टम अधिकारी गरिमा देशमुख या नावाने फोन आला. तुमचे अफगाणिस्तानातून एक पार्सल आले असून त्यासाठी तुम्हाला 87 हजार भरावे लागतील असे सांगितले. पार्सल खरोखर आलं या आनंदात देसले यांनी सुरुवातीला 87 हजार बँकेतून भरले. दरम्यान अफगाणिस्तानातून आलेल्या पार्सलमध्ये डॉलर्स असून तुम्हाला ते हवं असेल तर आणखी 2 लाख 40 हजार भरण्यास सांगितले. देसले गुरुजींनी पार्सल घेण्यासाठी आपल्या पत्नी व मुलीचे दागिने मोडले आणि एकूण 3 लाख 27 हजार रक्कम बँक अकाउंटवर जमा केली. मात्र पुन्हा आणखी 1 लाख 70 हजार रुपये भरण्याची मागणी झाल्याने संजय यांना संशय आला. त्यांनी तात्काळ मुंबतील आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधत सर्व माहिती सांगितली. कस्टम अधिकारी गरीमाच्या सांगण्यावरून वेळोवेळी ही रक्कम देसले यांनी भरली. तोपर्यंत देसले यांनी 3 लाख 27 हजार रूपये गमावले होते. पैसे भरूनही पार्सल मिळत नसल्याने देसले यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ना अफगाणिस्तानातील इलीस मिशेलचा संपर्क होत होता. ना मुंबईतून फोन करणार्‍या गरीमा देशमुखचा मोबाईल लागत होता. त्यामुळे देसले यांना धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचं संजय देसले यांच्या लक्ष्यात आलं. दरम्यान, या प्रकाराने अस्वस्थ असलेल्या संजय देसले यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या प्रकरणी भादंवि 419, 420, 34 सह आय.टी.अ‍ॅक्ट 66 (डी) अन्वये धुळ्यातल्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी सायबर पोलीस ठाण्यात भेट देऊन हे प्रकरण समजून घेतले. शिवाय तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना करण्यास सांगितले. पोनि.देशमुख यांनीही लागलीच तपासाला सुरूवात करीत हाती आलेल्या मोबाईल व ई-मेलचा शोध घेतला असता ते नालासोपारा, पालघर परिसरातील असल्याचे स्पष्ट झालं आहे. तसेच त्याची लिंक गाझियाबादपर्यंत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान सायबर क्राईम पोलीस तपास करत आहेत.
First published:

Tags: Cyber crime, Dhule

पुढील बातम्या