उघड्या विद्युत तारांचा स्पर्श होताच सासू-सुनेचा जागीच मृत्यू, नातवंडे गंभीर

उघड्या विद्युत तारांचा स्पर्श होताच सासू-सुनेचा जागीच मृत्यू, नातवंडे गंभीर

सिडको भागातील उत्तमनगरात शिवपुरी चौकात राहणाऱ्या सासू-सूनेला विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

  • Share this:

नाशिक, 29 सप्टेंबर: सिडको भागातील उत्तमनगरात शिवपुरी चौकात राहणाऱ्या सासू-सूनेला विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी सकाळी केदारे कुटुंबवर काळाने घाला घातला आहे. सोजाबाई मोतीराम केदारे (80) आणि सिंधुबाई शांताराम केदारे(40) अशी मृतांची नावे आहेत. तर मदतीला धावून गेलेले नंदिनी शांताराम केदारे (23) व शुभम शांताराम केदारे (19) या हे बहीणभाऊ गंभीररीत्या भाजले गेले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, सर्वत्र नवरात्रोत्सवाची वातावरण असताना शहरातील शिवपुरी चौकात रविवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. केदारे कुटुंबातील सिंधुबाई शांताराम केदारे या कपडे वाळवण्यासाठी घराच्या गच्चीवर गेल्या असता त्यांना घराला लागूनच असलेल्या उच्च विद्यूत प्रवाहाच्या तारेच्या झटका बसला. त्या एकदम ओरडल्याने जवळच असलेल्या त्यांच्या सासूबाई सोजाबाई मोतीराम केदारे (80) यांनी सूनेला ओढण्याचा प्रयत्न करताच त्यांनाही विजेचा झटका बसला. या घटनेत दोघेही गंभीर भाजल्याने जागेवरच कोसळल्या. त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या मदतीला धावून गेलेले नंदिनी शांताराम केदारे व शुभम शांताराम केदारे या भाऊ बहिणींना ही वीज प्रवाहाचा झटका बसल्याने तेही दूरवर फेकले गेले. दोघे भाऊ-बहीणला गंभीररित्या भाजले गेले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटस्थापनेच्या दिवशी केदारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

घटनेमुळे शहरातील उघड्या विद्युत तारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यूत कंपनीच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी जाब विचारत रास्ता रोको केला. सिडकोतील उघड्या विद्यूत तारांमुळे आतापर्यंत 5 ते 6 नागरिकांनाचा मृत्यू झाला आहेत. आणखी किती बळी जाण्याची महापालिका प्रशासन व वीज वितरण कंपनी प्रतीक्षा करणार का? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.

वीज कंपनीच्या निष्काळजीपणा वरून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. परिस्थिती तणावपूर्ण होत असतानाच वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत परोपकारी यांनी कुमक तैनात करून नागरिकांना शांततेचे आवाहन केले.

Navratri 2019:तुळशीच्या पानांनी सजली माऊली; विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची मांदियाळी

Published by: Sandip Parolekar
First published: September 29, 2019, 8:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading