सुमित सोनावणे, प्रतिनिधी
दौंड, 7 डिसेंबर : रात्री उशिरा दौंड मनमाड-सांगली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगान जाणाऱ्या दुचाकीला अपघात झाला असून त्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या बाईकवरून डबलसीट सुसाट वेगानं जात असताना दुचाकी बॅरिकेट्सवर धडकली. वेगात बाईक असल्यानं इतक्या जोरात धडकली की यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. बॅरिकेटला बाईक धडकली आणि दोघंही खाली कोसळले. एकाचं शीर धडापासून वेगळ झालं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे.
या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जखमीला स्थानिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. तर मृत्युमुखी पडलेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दौंडमध्ये हा भीषण अपघात झाला आहे.
दौंडमध्ये बॅरिकेटला दुचाकीची जोरदार धडक, अपघातात एकाचा जागीच मृत्यू एक जण गंभीर जखमी pic.twitter.com/oSqFfqvh5k
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) December 7, 2020
हे वाचा-माजी सरकारी अधिकाऱ्यानं केली मोलकरणीची हत्या; कारण ऐकून धक्का बसेल
दौंड मधील 160 क्रमांक असलेल्या मनमाड- सांगली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला. महामार्गावरील गजानन सोसायटीच्य जवळील बारामतीकडे जाणाऱ्या लेनच्या मध्यभागी गेल्या काही दिवसांपासून चेंबर तुटून तुंबले होते. त्यामुळे अपघात होऊ नये म्हणून बॅरॅकेट उभे केले होते. या दुचाकीस्वराला रात्रीच्या वेळी बॅरिकेट न दिसल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची बॅरिकेटला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील दुचाकीस्वराचे शीर धडापासून वेगळे होऊन काही अंतरावर जाऊन पडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.