भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, वैद्यकीय अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, वैद्यकीय अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

या भीषण अपघातामध्ये जबर मार लागल्यामुळे डॉ शिवशंकर वरकड जागीच ठार झाले.

  • Share this:

किशोर गोमासे, प्रतिनिधी

वाशिम, 04 मे: वाशिम (Washim) जिल्ह्यातील रिसोड -लोणार महामार्गावर (Risod-Lonar highway) दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे.

दुचाकीच्या भीषण अपघातात मोप आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवशंकर वरकड जागीच ठार झाले आहे. लोणारवरून डॉ. शिवशंकर वरकड हे MH 20 EQ 7960 या क्रमांकाच्या मोटारसायकलने मोप इथं जात होते.  त्याच वेळेस  रिसोड - लोणार महामार्गावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने रिसोड वरून येणाऱ्या गाडी क्रमांक MH 38 U 8192 या मोटारसायकल स्वाराने डॉ. शिवशंकर वरकड यांच्या गाडीला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की,  यात दोन्ही गाड्यांचा यात चुराडा झाला.

या भीषण अपघातामध्ये जबर मार लागल्यामुळे डॉ शिवशंकर वरकड जागीच ठार झाले. तर दुसरा मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी व्यक्तीला वाशिम इथं पाठविण्यात आलं आहे. अपघाताचा तपास रिसोड पोलीस करत आहेत.

गट्टू बनविणाऱ्या कारखान्याला आगीत 4 कोटींचं आर्थिक नुकसान

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील मुंगळा शेत शिवारात असलेल्या बबन विसपुते यांचा शेतातील कुटारापासून बनविण्यात येणाऱ्या गट्टू कारखाना आहे. या कारखान्याला सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये कारखान्यातील सर्वच साहित्य जळून खाक झाले असून 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मात्र, सुदैवानं यामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नाही. वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला असून 5 तासाच्या प्रयत्ना नंतर 10 वाजता आग आटोक्यात आली आहे. मात्र आग नेमकी कशाने लागली याचं कारण कळू शकले नसून, या आगीत कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Published by: sachin Salve
First published: May 4, 2021, 4:42 PM IST

ताज्या बातम्या