नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा, 18 मे : रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्यामुळे दुचाकीचा आणि बैलगाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तरुण आणि बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वर्धा चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर खांबाडा शिवारात रात्रीच्या सुमारास वरोराकडे जात असलेल्या बैलगाडीला दुचाकीने जबर धडक दिली. यात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला.
वेगात असल्यामुळे गाडीची आणि बैलगाडीची जोरात धडक बसली की ज्यात बैलगाडीचा एक बैल आणि दुचाकीस्वार अश्विन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुशील कडू हा तरुण या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. दोघेही वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील मुरपाठ येथील रहिवासी आहे.
हेही वाचा : मृत्यू कसा होतो हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या; प्राध्यापकांना पाठवला मेल
घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमीला सुशीलला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं तर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, अपघातामध्ये बैलाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्याचा हा बैल होता त्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत तर या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
एका पाठोपाठ 4 जणांनी झाडल्या गोळ्या, हत्येचा थरार CCTV मध्ये कैद