• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • पालिकेच्या सेंटरमधूनच कोरोना बाधितांना दिला जात होता निगेटिव्हचा रिपोर्ट, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पालिकेच्या सेंटरमधूनच कोरोना बाधितांना दिला जात होता निगेटिव्हचा रिपोर्ट, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कोरोना बाधित असतानाही निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

  • Share this:
ठाणे, 19 मे: कोरोनाच्या (Corona) या संकटातही अनेकजण पैसे कमावण्यासाठी अशा काही मार्गांचा अवलंब करत आहेत की ज्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. आता ठाणे पोलिसांनी (Thane Police) अशा एका टोळीचा पर्दाफाश केला आहे जी कोरोना बाधित रुग्णांकडून पैसे घेऊन त्यांना चक्क कोरोना निगेटिव्हचा रिपोर्ट (Covid19 Negative Report) देत असत. वाचून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. ठाण्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. खाजगी टेस्टिंग सेंटरमधून बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देण्याच्या घटना आतापर्यंत समोर आल्या होत्या. मात्र, आता चक्क पालिकेच्या कोविड सेंटरमधून बनावट निगेटिव्ह अहवाल देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यातील गुन्हे शाखेने या प्रकरणातील रॅकेटचा पर्दाफाश केला असून दोन वॉर्डबॉयला अटक केली आहे. मूल होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या; लग्नाला झालं होतं फक्त एक वर्ष खाजगी लॅबमध्ये आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही निगेटिव्ह देण्याचा सावळागोंधळ करण्यात येत होता. पण आता पालिकेच्या पार्किंग प्लाझा रुग्णालयातच निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देणारे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करुन घेतल्यावर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. कोरोना पॉझिटिव्हचे रिपोर्ट निगेटिव्ह तसेच त्या रिपोर्टवर पार्किंग प्लाझा रुग्णालयाच्या डॉक्टरांची सही असल्याचंही समोर आलं. इतकेच नाही तर मृतक हे कोरोनाची बाधा झालेले रुग्ण होते त्यानंतर अन्य चार कोरोना बाधितांचेही निगेटिव्ह रिपोर्ट आरोपी अफसर तेजपाल मंगवाना याच्या माध्यमातून मिळवले. त्यानंतर याची खात्री पोलिसांना पटली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी अफसर तेजपाल मंगवाना याला अटक केली. स्वॅब न घेताच ठाणे मनपाचा बोगस आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या आरोपीसोबतच आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीचे नाव संकपाल भारकर धवने असून तो पालिकेच्या लॅबमध्ये असेच बनावट रिपोर्ट नागरिकांना काही रुपयांच्या मोबदल्यात देत होता.
Published by:Sunil Desale
First published: